मुंबई : वाढत्या वयात शरीर कमजोर होण्यासोबतच आणखीही वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढू लागतात. वाढत्या वयासोबतच दातांचीही समस्या होऊ लागते. जर वेळेवर दातांची काळजी घेतली गेली नाही तर दात पडण्याची शक्यता अधिक असते. तोंडाची दुर्गंधी येणे आणि हिरड्यांचा त्रास होणे अशाही समस्या होऊ लागतात. चला जाणून घेऊ वाढत्या वयासोबत दातांची काळजी कशी घ्यावी...
वेळोवेळी तपासणी करा
वय कोणतही असो दातांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. अनेकदा असं वाटत असतं की, दात मजबूत आहेत. पण त्या दातांमधील घाण हळुहळु दातांना कमजोर करते.
फ्लोराईडचं प्रमाण वाढवा
दात निरोगी ठेवण्यासाठी आणि कॅव्हिटीपासून सुरक्षा मिळवण्यासाठी फ्लोराईडची भूमिका महत्वाची ठरते. त्यासोबतच फ्लोराईड टूथ इनॅंमल तयार करण्यातही मदत करतो.
तोंड कोरडं पडू देऊ नका
लाळ दात निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी मदत करते. जर तोंड कोरडं पडलं तर दात आणि हिरड्यांमधील लाळ नष्ट होते. ज्यामुळे दात कमजोर होतात.
खाण्या-पिण्याची घ्या काळजी
तुमची खाण्याची सवय दातांच्या निरोगी राहण्यासाठी महत्वाची ठरते. पदार्थांमधील व्हिटॅमिन डि आणि कॅल्शिअम दातांना मजबूत करतात. त्यामुळे हे तत्व असलेले पदार्थ योग्य प्रमाणात खायला हवे.
चांगला टूथ ब्रश वापरा
दातांना निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी टूथब्रशची भूमिकाही महत्वाची ठरते. टूथब्रश जर चांगला असेल तर दातांची स्वच्छता योग्यप्रकारे होईल. पण जर ब्रश चांगला नसेल तर हिरड्यांना इजाही होऊ शकते.
तोंडाच्या रोगामुळे हृदय होतं कमजोर
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, तोंडाशी संबंधीत रोगांमुळे हृदयही प्रभावित होतं. अनेक शोधांमध्ये असा खुलासा झाला आहे.