शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

सॅनिटरी नॅपकिन बदलण्याआधी, नंतर 'असा' निष्काळजीपणा करत असाल; तर वेळीच सावध व्हा

By manali.bagul | Published: December 14, 2020 11:50 AM

Women Care Tips in Marathi : मासिक पाळीच्या दिवसात अंघोळ करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. 

(Image Credit- chapelhillobgyn)

साधारणपणे महिला  हिवाळ्याच्या दिवसात गरम पाण्याने अंघोळ करतात. महिलांनी मासिक पाळीच्या ५ दिवसात गरम पाण्यानेच अंघोळ करायला हवी. जेणेकरून तुम्हाला मासिक पाळीच्या वेदना जाणवणार नाहीत. घरोघरच्या महिलांना सकाळच्यावेळी कामाची घाई असते. अशा स्थितीत अनेकदा थंड पाण्याने अंघोळ केली जाते. असं करण आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.  मासिक पाळीच्या दिवसात  अंघोळ करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. 

सॅनिटरी नॅपकिन बदलण्याआधी, नंतर  हात स्वच्छ धुवून घ्या

अंघोळ करताना पॅड बदलण्याच्या आधी आणि नंतर हात साबणाने स्वच्छ करून घ्या. असं केल्याने नुकसानकारक बॅक्टेरिया पसरण्याचा धोका कमी होतो. मासिक पाळीच्यावेळी अंघोळ करताना गरम पाण्याचा वापर करा. पाणी कोमट असावे जास्त गरम असून नये जेणेकरून त्वचेला नुकसान पोहोचून त्वचा जळणार नाही. गरम पाण्याने वेदनेपासून आराम मिळतो. गरम पाण्याने मसल्सची लवचीकता वाढते. अंघोळ करताना गरम पाण्यात सेंधा मीठ घाला.

चिंता वाढली! कोरोनाच्या प्रसाराबाबत नवीन माहिती समोर; 'या' ५ Genes च्या लोकांना धोका जास्त

मीठ वेदना निवारक असते तसंच त्वचेतील रोम छिद्रांमधील घाण साफ होते. वेदनादेखील कमी होतात. पीरियड्स दरम्यान आंघोळ केल्यावर शरीरात मोहरीचे तेल किंवा नारळ तेल लावा. हे आपल्या शरीरावर एक नैसर्गिक थर निर्माण करेल, तसेच शरीरास त्वरीत गरम करेल. तेल जास्त प्रमाणात लावू नका. नाहीतर कपडे तेलकट, खराब होऊ शकतात.

अंघोळ झाल्यावर गरम पाणी किंवा ग्रीन टी घ्या. असे केल्याने शरीर उबदार राहण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत होईल. यावेळी दूधातून बनविलेले चहा पिणे टाळावे. आपण इच्छित असल्यास, आपण ब्लॅक टी पिऊ शकता. सकाळी या सर्वांबरोबर एक किंवा दोन बिस्किटे किंवा टोस्ट खा.

स्वच्छ सॅनिटरी नॅपकिन वापरा

तुम्ही स्वच्छ कापड वापरणार असाल ते धुवून उन्हात वाळवणार असाल तर कापड वापरायला काहीच हरकत नाही. फक्त काळजी एवढीच घ्यायला हवी की, अनेकजणी कुणाला दिसु नये म्हणून अंधारात, कपडय़ांच्या खाली हे कापड वाळत घालतात ते नीट वाळत नाही, निजर्तुक होत नाही. कडक होतं ते कापड वापरून त्वचेला इजा होते. चालता येत नाही. त्याअवस्थेत मुली काम करतात. त्यातून वेदना होतात. इन्फेक्शन्स वाढतात.

CoronaVirus : भारतात लसीशिवाय नष्ट होतेय कोरोनाची महामारी? तज्ज्ञांनी सांगितलं की.....

त्यामुळे कापड जर वापरणारच असाल तर स्वच्छ उन्हात वाळवलेलंच कापड वापरा. खेडय़ातच नाही तर शहरातही नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न आहे. याविषयातले जाणकारही आता सांगू लागले आहेत की पुर्वीचा कापडाचा पर्याय अधिक सोयीस्कर होता. मोठय़ा शहरात नॅपकिन्सच्या विल्हेवाटीचे प्रश्न गंभीर होत आहेत. असे असताना जर तुम्ही स्वच्छ कापड वापरणार असाल, तर ते  कापड वापरण्यात चूक काही नाही. स्वच्छता हा मुद्दा आहे, फॅशन हा नाही.

एकच नॅपकिन किती काळ वापरायचा.? दिवसाला किमान किती नॅपकिन वापरायचे.?

नॅपकिन वापरण्याचा उद्देशच मुळात स्वच्छता पाळणे हा आहे. त्यामुळे दिवसाला किमान 3 नॅपकिन्स याप्रमाणे दर आठ तासानंतर एक नॅपकिन बदलायलाच हवा. ज्या मुलींना रक्तस्त्राव कमी होतो त्या एकच नॅपकिन दीर्घकाळ होतात. जे रक्त नॅपकिनमध्ये साठवलं जात त्यात जीवाणूंची वाढ होऊ शकते. गर्भाशय आणि योनीमार्गाची त्वचा नाजुक असते त्यातुन जंतुसंसर्ग होऊ शकतो. लैंगिक संबंधातून झालेले संसर्ग त्यामुळे वाढू शकतात. म्हणून नॅपकिन बदलण्याची दक्षता घ्यायलाच हवी. नॅपकिन वापरतोय ते फारस खराब नाही असे समजुन अनेक मुली तेच ते नॅपकिन वापरतात ते कपडा वापरण्याहूनही अधिक धोकादायक आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य