शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

तुमच्या नखांवर पांढरे डाग आहेत का? वेळीच व्हा सावध, अन्यथा पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 4:59 PM

सामान्यतः नखांवरील पांढऱ्या डागांना ल्यूकोनिशियासुद्धा म्हणतात. यामध्ये नखांच्या प्लेटचे नुकसान होते आणि त्यांचा रंग बदलतो. जर तुमच्या नखांवर पांढरे डाग दिसत असतील तर तुम्ही लगेच सावध व्हा.

जर कोणाला कोणता आजार असेल तर ती व्यक्ती डॉक्टरांकडे जाते, तपासणीदरम्यान डॉक्टर रुग्णांची नखेसुद्धा पाहतात. पूर्वीच्या काळी आयुर्वेदाचार्यसुद्धा नखे, हात आणि जीभ पाहून रुग्णाला झालेले रोग सांगायचे, कारण नखांवरून माणसाचे आरोग्य कसे आहे हे कळते. जर एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या किंवा पायाच्या नखांवर पांढरे डाग किंवा खुणा असतील तर याच्या मागे काहीतरी कारण नक्कीच असू शकते. सामान्यतः नखांवरील पांढऱ्या डागांना ल्यूकोनिशियासुद्धा म्हणतात. यामध्ये नखांच्या प्लेटचे नुकसान होते आणि त्यांचा रंग बदलतो. जर तुमच्या नखांवर पांढरे डाग दिसत असतील तर तुम्ही लगेच सावध व्हा.

१. मॅनिक्युअरमुळे होणार नुकसाननखांना मॅनिक्युअर केल्याने नखांच्या खालच्या त्वचेला नुकसान होऊ शकते, ज्याला नेलबेड म्हणतात. त्वचा तज्ज्ञांच्या मते, मॅनिक्युअरमुळे नखांना खूप नुकसान होऊ शकते आणि यामुळे नखांवर पांढरे डाग पडू शकतात. जर तुमचा मॅनिक्युरिस्ट नखे मॅनिक्युअर करण्यासाठी तीक्ष्ण उपकरणे वापरत असेल तर त्यामुळे तुमची नखे खराब होऊ शकतात आणि त्यावर पांढरे डागसुद्धा पडू शकतात. हे पांढरे डाग दिसणे हे नखांचे नुकसान होण्याचे लक्षण देखील असू शकते. मॅनिक्युअरमुळे नखे तुटणे, सोलणे किंवा कमकुवत होऊ शकतात.

२. फंगल इंफेक्शननखांवर पांढरे डाग पडण्याचे आणखी एक सामान्य कारण म्हणजे फंगल इंफेक्शन आहे. जेव्हा असे होते तेव्हा वातावरणातील सूक्ष्मजंतू तुमच्या नखांच्या किंवा आसपासच्या त्वचेच्या छोट्या जागेतून आतमध्ये जातात, त्यामुळे फंगल इंफेक्शन होते. या फंगल इंफेक्शनमुळे नखे तुटणे, घट्ट होणे किंवा पिवळे किंवा तपकिरी रंगाचे होणे हे फंगल इंफेक्शनचे लक्षण आहे. फंगल इंफेक्शनपासून नखांचे संरक्षण करण्यासाठी हे उपाय केले पाहिजेत.

  • धुतल्यानंतर हात किंवा पाय चांगले कोरडे करा.
  • पायाच्या नखांमध्ये पांढरे डाग असतील तर रोज मोजे बदलावे.
  • चांगले बसणारे, हवेशीर आणि जास्त घट्ट नसलेले शूज घाला
  • जिजिम, मैदान यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी अनवाणी चालणे टाळा.
  • फंगल इंफेक्शनच्या उपचारांसाठी, डॉक्टर अँटीफंगल औषधे लिहून देतात, ज्यापासून फंगल इंफेक्शन हळूहळू बरे होते.

३. कॅल्शियमची कमतरताकाही तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार, तुमच्या नखांवर पांढरे डाग हे तुमच्याकडे कॅल्शियमसारख्या खनिजांची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते. नखांची प्लेट काही प्रमाणात अनेक प्रकारच्या पोषक तत्त्वांनी बनलेली असते, त्यामुळे पोषक तत्त्वांची कमतरता नखांवर दिसू शकते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे या समस्या उद्भवू शकतात.

  • त्वचा कोरडी पडणे
  • नख कमजोर होणे
  • केस कमकुवत होणे
  • धातूच्या संपर्कामुळे

थॅलियम आणि आर्सेनिक यांसारख्या विषारी जड धातूंच्या संपर्कात आल्याने आपल्या नखांवर पांढरे डागांचे लक्षण दिसू शकते. या कारणामुळे गोवर रेषा नावाच्या पांढऱ्या पट्ट्या नखांमध्ये विकसित होऊ शकतात. यासोबतच या समस्याही उद्भवू शकतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स