- नितांत महाजनआपल्याला सगळ्यांना आनंदी रहायचं असतं. पण आपला आनंदी कितीही नाही म्हटलं तरी इतरांवरच अवलंबून असतो. तो तसा ठेवू नये हे आपल्याला कळतं, पण वळत नाही. आणि वळून उपयोगही नसतो अनेकदा कारण आपल्या अवतीभोवतीची माणसं आपल्या सुखदु:खाला कारण ठरत असतातच. पण तुम्हाला विचारलं की तुमच्या जगण्यात कुणामुळे जास्त आनंद आहे. कोण जास्त रंग भरतं तुमच्या जगण्यात? दोस्त की कुटूंब? प्रश्न सोपा आहे, उत्तर तितकं सोपं नाही. पण तरी मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या एका अभ्यासानुसार काही लाख लोकांना असं वाटतं की, कुटूंबापेक्षा मित्रांमुळे आपण जास्त आनंदी होतो. मित्र आपल्या आयुष्यात अनेक आनंद भरतात आणि जगण्याला उमेद देतात.मिशिनग स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार हे अत्यंत वेगळे आणि बदलत्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकणारे एक नवे चित्र समोर आहे आहे. हेल्थ अॅण्ड हॅपिनेस या विषयांत विविध अभ्यास करणाऱ्या इथल्या संशोधकांनी २,७१,००० लोकांशी संपर्क केला. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत काही प्रश्नावल्या भरुन घेतल्या. त्या साऱ्या माहितीचे संकलन अर्थात डाटा प्रोसेसिंंग करण्यात आलं. आणि त्यातून काही निष्कर्ष काढण्यात आले.हा अभ्यास असं म्हणतो की, तरुण वयात मित्रांचा शब्द प्रमाण असतोच. मित्र आयुष्यात कुणाही पेक्षा अधिक महत्वाचे असतातच. मात्र वय वाढतं, प्रौढ होत जातात लोक तसतसे मित्रांचे महत्व आयुष्यात जास्त वाढते. वय वाढतं तशी ही मैत्री, त्याकाळातले निवडक, गिनेचूने मित्र जास्त महत्वाचे होत जातात. याकाळात सोबत चांगले मित्र असतील तर जगण्याचे, वाढत्या वयाचे पठारावस्था अधिक सोपी आणि आनंदी होते. ज्यांच्या वाट्याला असे मित्र येत नाहीत ते अधिक एकेकटे, कडवट आणि आतून जास्त कोरडे होत जातात.
मित्र चांगले असतील तर वाढत्या वयात माणसं आनंदी तर राहतातच पण त्याच काळात त्यांची तब्येतही चांगली राहते.मित्र कधी साथ देतात.१) क्रॉनिक आजार असेल, मोठा आजार स्वत:ला किंवा घरात कुणाला झाला तर मित्र जास्त साथ देतात.२) एक फील गूड आपल्या अवतीभोवती कायम ठेवतात.३) अवघड परस्थितीत साथ सोडत नाहीत.४) कठीण परिस्थितीत मदतीला धावतात. धीर देतात.५) फक्त दोष न देत राहता, उपाय सुचवतात.६) हेवेदावे न करता, साथ देतात.७) त्यांच्याशी शेअरिंग सोपं होतं,मिळालेल्या माहितीचं ते राजकारण करत नाहीत.