भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करावा लागत आहे. कोरोनचा कहर दिवसेंदिवस भारतात वाढत आहे. अशा स्थिती जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी सांगितले की, भारतात कोरोनाच्या नव्या वेरिएंटमुळे कोरोनाचा विस्फोट होत आहे. हा नवीन स्ट्रेन जास्त संक्रामक आणि जीवघेणा आहे. या व्हायरसपासून बचावासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे.
AFP ला दिलेल्या मुलाखतीत सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, ''भारतात कोरोनाचा उद्रेक होण्याचं कारण नवीन वेरिएंट आहे. भारतात या वेरिएंटचा वेगानं वेगानं प्रसार होत आहे. भारतात शनिवारी ४ हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा सामना करावा लागला आहे. तर ४ लाखांपेक्षा जास्त नवीन प्रकरणं समोर आली आहेत. ''
डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या की, ''ऑक्टोबरमध्ये भारतात सापडलेला कोरोनाचा नवा वेरिएंट B.1.617 आता दररोज कोट्यावधी लोकांना आपलं शिकार बनवत आहे . हा प्रकारही वेगाने बदलत आहे, जो लोकांसाठी घातक ठरत आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार वास्तविक स्वरूपापेक्षा बराच धोकादायक आहे आणि तो लोकांमध्ये खूप वेगाने पसरत आहे.''
कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा
''अमेरिका आणि ब्रिटन सारखे देश हा प्रकार गंभीरपणे घेत आहेत आणि मला आशा आहे की, डब्ल्यूएचओ लवकरच यावर काही नियम ठरवेल. हा प्रकार इतका धोकादायक आहे की तो शरीरात एंटीबॉडी बनविणे देखील थांबवतो आणि फार वेगात बदलतो. भारतात संक्रमित लोकांची संख्या झपाट्यानं वाढण्यामागे नव्या स्ट्रेन इतकाच लोकांचा निष्काळजीपणाही कारणीभूत ठरत आहे. सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर लोकांनी कमी केला आहे.'' असं मत त्यांनी यावेळी मांडले.
अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार
त्या म्हणाल्या की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राजकारण्यांनी आयोजित केलेले मोठ्या प्रमाणात निवडणूक मेळावे देखील यासाठी जबाबदार आहेत. या रॅलीने कोट्यवधी लोकांना आकर्षित केले, ज्यामुळे त्याचा प्रसार अधिक वेगाने झाला. पुरेशा लोकांच्या लसीकरणासह आपल्याला कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेचा सामना करावा लागणार आहे.''