(Image Credit : mmgazette.com)
विश्व स्वास्थ्य संस्थेतर्फे (World Health Organization) बुधवारी एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये लहान मुलांच्या आरोग्यासाठी काही गाइडलाइन्स सांगण्यात आल्या आहेत. अहवालामध्ये सांगितल्यानुसार, मुलांचा हेल्दी विकास होण्यासाठी त्यांना शक्य तेवढं इलेक्ट्रॉनिक स्क्रिन्सपासून दूर ठेवा. विश्व स्वास्थ्य संस्थेने अहवालामध्ये सांगितल्यानुसार, सध्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि डिवाइस जरी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले असले तरिदेखील मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवणंचं फायदेशीर असतं. खासकरून 5 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूरचं ठेवा.
विश्व स्वास्थ्य संस्थेने दिलेल्या गाइडलाइन्स :
- एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या नवजात बालकांना स्क्रिनसमोर अजिबात घेऊन जाऊ नका. त्याचबरोबर लहान मुलांना दिवसभरामध्ये 1 तासापेक्षा जास्त स्ट्रॉलर्स, हाय-चेयर्स किंवा स्ट्रॅप ऑन कॅरियर्समध्ये ठेवू नये. एक वर्षापर्यंतची मुलं दिवसभर जेवढी अॅक्टिव्ह राहतील तेवढचं त्यांच्यासाठी फायदेशीर राहतं.
- 1 ते 2 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी काही मिनिटांचाच स्क्रिन टाइम पुरेसा असतो. त्याचबरोबर कमीत कमी 3 तासांसाठी फिजिकल अॅक्टिविटी अशा मुलांसाठी अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे त्यांचा विकास होण्यासोबतच ते अॅक्टिव्ह होण्यासही मदत होते.
- 3 ते 4 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी दिवसभरामध्ये 1 तासापेक्षा जास्त स्क्रिनच्या समोर राहणं घातक असतं. मग ती टिव्हीची स्क्रिन असो किंवा स्मार्टफोन आणि गॅझेटची. या वयाच्या मुलांना दिवसभरामध्ये कमीत कमी 3 ते 4 तासांची फिजिकल अॅक्टिव्हिटी करणं गरजेचं असतं. त्यामुळे या वयात मुलं जास्तीत जास्त अॅक्टिव्ह राहतील याकडे पालकानी लक्ष देणं गरजेचं असतं.
स्क्रिन टाइम जास्त असल्याने असतो लठ्ठपणाचा धोका
विश्व स्वास्थ्य संस्थेने सांगितल्यानुसार, 5 वर्षांची मुलं जर जास्तीत जास्त स्क्रिनसमोर वेळ घालवत असतील तर अशा मुलांची लाइफस्टाइल निष्क्रिय आणि गतिहीन होते. ज्यामुळे त्यांची अॅक्टिव्हिटी लेव्हल कमी होते आणि झोप येत नाही. यामुळे अनिद्रेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर पुढे जाऊन मुलांना लठ्ठपणा आणि त्याच्याशी निगडीत दुसऱ्या आजरांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मुलांना वेळीच स्क्रिनपासून दूर ठेवणं फायदेशीर ठरतं.