विश्व स्वास्थ्य संस्था म्हणजेच, World Health Organization (WHO) ने सांगितल्यानुसार, जगभरातील देश, तेथील प्रशासन आणि उपभोक्ते यांनी इलेक्ट्रॉनिक सिगारेट सारख्या उत्पादनांच्या प्रचारावर अजिबात विश्वास ठेवू नये. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, इलेक्ट्रॉनिक सिगरेटमुळे शरीरासाठी होणारं नुकसान साधारण सिगारेटपेक्षा कमी आहे, असं असेन कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, त्यांच्या या गोष्टींना अजिबात बळी पडू नका. कारण ही तंबाखू उत्पादनांच्या प्रचाराची रणनिती आहे.
पूर्णपणे निकोटिनचं सेवन बंद केलं तरच होतो फायदा
WHO ने 2019 जागतिक तंबाखू रोगाच्या अहवालानुसार, तंबाखू उद्योगात, तंबाखू नियंत्रणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. ई-सिगारेटशी निगडीत जाहिरातींमध्ये असं सांगितलं जातं की, पारंपारिक सिगारेटच्या बदल्यात इलेक्ट्रॉनिक सिगारेट सुरक्षित आहेत आणि ही सिगारेटची सवय सोडण्यासाठी मदत करते. पण जर WHOने सादर केलेल्या अहवालावर नजर टाकली तर, जाहिरांतींमध्ये सांगण्यात येणाऱ्या गोष्टी पूर्णतः बरोबर नाहीत. जर सिगारेट ओढणाऱ्या व्यक्ती जेव्हा पूर्णपणे सिगारेट ओढणं किंवा निकोटिनचं सेवन करणं सोडतात, तेव्हाच त्यांना फायदा होतो.
सिगारेट आणि ई सिगारेटमुळे होणारं नुकसान सारखचं
अमेरिकेतील तरूणांमध्ये ई-सिगारेट फार लोकप्रिय होत आहे. अमेरिकेतील खाद्यपदारअथ आणि औषधी प्रशासन गेल्या काही वर्षांपासून ई-सिगारेटच्या विक्रिवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपायांची घोषणा करत आहेत. डब्लूएचओ तंबाखू नियंत्रण अधिकारी विनायक प्रसाद यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि पारंपारिक सिगारेट प्यायल्याने होणारं नुकसान एकसारखचं आहे.
ई-सिगारेटमध्ये दिसत नाही स्पष्ट धूर
सर्वात मोठं अंतर आहे की, इलेक्ट्रॉनिक सिगारेटमध्ये कोणताही स्पष्ट धूर दिसत नाही. त्यामुळे अनेकांचा गैरसमज असतो की, ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
टिप : वरील सर्व गोष्टी अहवालातून स्पष्ट करण्यात आल्या असून यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. या सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.