शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

जगभरात सर्वाधिक कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 4:34 PM

coronavirus : डेल्टा व्हेरिएंट काळानुसार बदलला आहे आणि अधिक संक्रमक झाला आहे. सध्या संक्रमणाच्याबाबतीत हा कोरोना व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटला सक्रियपणे मागे टाकत आहे, असे मारिया व्हॅन कर्खोव यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा जगभरात सर्वाधिक प्रसारित होणारा प्रमुख व्हेरिएंट आहे. डेल्टा व्हेरिएंट हा प्रसार आणि संक्रमणाच्या बाबतीत अल्फा, बीटा आणि गामा व्हेरिएंट्सना मागे टाकत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन कर्खोव यांनी बुधवारी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. (who says delta is globally dominant variant of coronavirus replacing other variants of concern)

डेल्टा व्हेरिएंट काळानुसार बदलला आहे आणि अधिक संक्रमक झाला आहे. सध्या संक्रमणाच्याबाबतीत हा कोरोना व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटला सक्रियपणे मागे टाकत आहे, असे मारिया व्हॅन कर्खोव यांनी म्हटले आहे. तसेच, सध्या अल्फा, बीटा आणि गामा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव एक टक्क्यापेक्षा कमी होत आहे, असे मारिया व्हॅन कर्खोव यांनी सोशल मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले. दरम्यान, डेल्टा व्हेरिएंटचा जगभरात प्रामुख्याने प्रसार होत आहे.

याचबरोबर,  डेल्टा व्हेरिएंट अधिक शक्तिशाली बनला आहे, तो अधिक संसर्गजन्य आहे आणि तो उर्वरित व्हेरिएंटचे स्थान घेत आहे, असेही मारिया व्हॅन कर्खोव यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, डब्ल्यूएचओने अल्फा, बीटा, गामा व्हेरिएंटसह ईटा, आयोटा आणि कप्पा व्हेरिएंटला खालच्या स्तरात ठेवले आहे. याचा अर्थ असा की हे व्हेरिएंट यापुढे जागतिक सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत नाहीत.

भारतात कोरोनाची परिस्थितीकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटी 35 लाख 63 हजार 421 आहे. यामध्ये, सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाख एक हजार 640 वर आली आहे. ही संख्या गेल्या 187 दिवसांतील सर्वात कमी आहे. गेल्या 24 तासांत फक्त 31923 नवीन प्रकरणे नोंदवली गेली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना