जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार युरोप आणि जगभरातील इतर देशांमध्ये लसीशिवायही कोरोना कोरोनाच्या माहामारीवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. पण त्यासाठी स्थानिक पातळीवर लॉकडाऊन करायला हवं. जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोपातील प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेलं लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. इटलीच्या तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोन संक्रमित रुग्णांना व्हायरसच्या माहामारीपासून पूर्णपणे बचाव करण्यासाछी एका महिन्याचा कालावधी लागू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे क्षेत्रिय प्रमुख हॅन्स क्लूग यांनी सांगितले की, जेव्हा आपण माहामारीवर विजय मिळवू तेव्हा हा विजय लसीमुळेच मिळेल असं नाही. लस नसतानाही हे शक्य आहे. तोपर्यंच आपण माहामारीसोबत जगायला शिकलेले असू. येत्या काळात कोरोनाची दुसरी लाट आल्यास पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल का याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, याची गरज पडणार नाही अशी अशा मला आहे. पण स्थानिक पातळीवर कोरोनाशी लढण्यासाठी लॉकडाऊन केलं जाऊ शकतं.
एका महिन्यात शरीरातील व्हायरसचा प्रसार कमी होतो
इटलीतील वैज्ञांनिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमित रुग्णांना व्हायरसच्या प्रभावातून बाहेर येण्यासाठी जवळपास १ महिन्याचा कालावधी लागतो. म्हणून रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर पुन्हा चाचणी करणं गरजेचं आहे. पाच निगेटिव्ह चाचण्यांपैकी एक चुकीची असते. इटलीच्या मोडोना एंटी रेजिओ एमिलिया युनिव्हर्सिटीतील डॉ. फ्रांसिस्को वेंतुरेली आणि त्यांच्या सहकारी वर्गाने १ हजार रुग्णांवर अभ्यास केला होता.
यात असं दिसून आलं की दुसरी टेस्ट १५ दिवसांनंतर, तिसरी १४ दिवसांनी आणि चौथी चाचणी ९ दिवसांनी करण्यात आली होती. यात ज्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता ते पुन्हा पॉजिटिव्ह दिसून आले. जवळपास सरासरी पाच लोकांच्या निगेटिव्ह चाचण्या चुकिच्या होत्या. या अभ्यासानुसार ५० वर्षाच्या लोकांना ३५ दिवस आणि ८० वर्षाच्या लोकांना बरं होण्यासाठी ३८ वर्षांचा कालावधी लागला होता.
लक्षणं नसलेल्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना सर्वांच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. लक्षणं नसलेल्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच या कोरोनाग्रस्तांच्या शरीरात व्हायरसचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याची माहिती मिळत आहे.काही कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणं दिसतात तर काहींमध्ये लक्षणं दिसत नाहीत. मात्र आता लक्षणं असलेल्या रुग्णांच्या तुलनेत लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या शरीरात व्हायरसचं प्रमाण जास्त असल्याचं रिसर्चमधून समोर आली आहे.
तेलंगणातील 200 हून अधिक कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या रिसर्चमधून कोरोना व्हायरसशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होत आहे. हैदराबादच्या सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स (CDFD) च्या शास्त्रज्ञांनी आणि इतरही संशोधकांनी मिळून हा रिसर्च केला आहे. लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या प्राथमिक आणि द्वितीय संपर्काची माहिती मिळून त्यांची तपासणी करून त्यांना देखरेखीत ठेवलं. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने संशोधन करण्यात आले आहे. सीडीएफडीच्या लॅबोरेटरी ऑफ मॉलिक्युलर ऑन्कोलॉजीचे (Laboratory of Molecular Oncology) मुरली धरण बश्याम यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे.
हे पण वाचा-
चिंताजनक! 'या' कारणामुळे महिलांच्या तुलनेत पुरूषांसाठी जास्त जीवघेणा ठरतोय कोरोना
नाष्त्याला पोहे खाण्याचे 'हे' ५ आरोग्यदायी फायदे वाचाल; तर रोज आवडीनं खाल
खुशखबर! इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही उपचारांशिवाय मानवी शरीरानं केली HIV वर मात