शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सावधान! 'या' पदार्थाच्या सेवनाबाबत WHO चा इशारा, दरवर्षी होणाऱ्या मृत्युचा आकडा वाचून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 10:30 AM

'मिठाचं सेवन कमी करण्यासाठी आणि लोकांना चांगला आहाराचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार गेला पाहिजे'.

खाद्यपदार्थांमध्ये मिठाचा जास्त वापर हृदय रोग (Heart Disease) आणि स्ट्रोकचं कारण बनू शकतो. यामुळे लोकांना हृदयरोग आणि स्ट्रोकच्या समस्या अधिक प्रमाणात होत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) बुधवारी खाण्यातील सोडिअम कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

एका रिपोर्टनुसार, जगभरात अंदाजे ११ मिलियन मृत्यू दरवर्षी खराब आहार म्हणजे खराब डाएटमुळे होतात. यातील ३ मिलियन म्हणजे ३० लाख अशा केसेस आहेत जे त्यांच्या डाएटमध्ये सोडिअम जास्त प्रमाणात सेवन करत होते. WHO ने सांगितले की, अनेक श्रीमंत देशात आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लोक निर्मिती खाद्य साहित्य म्हणजे मॅन्यूफॅक्चर्ड फूडचा वापर करतात. जसे की, ब्रेड, सेरिअल, प्रोसेस्ड मांस आणि चीजसारखे डेअरी प्रॉडक्ट्स. यात जास्त प्रमाणात सोडिअमचा वापर केला जातो. (हे पण वाचा : Covid-19 second wave: हार्ट अ‍ॅटॅकमुळे का होतोय कोरोना बाधितांचा मृत्यू? जाणून घ्या, लक्षणं आणि उपचार)

काय म्हणाली WHO?

सोडिअम क्लोराइड हे मिठाचं रासयनिक नाव आहे आणि सोडिअम एक खनिज आहे. जे शरीरातील पाण्याचं प्रमाण नियंत्रित करतं. सोडिअमचंच्या सेवनाबाबत WHO चे डायरेक्टर जनलर टेड्रोस एडनॉम घेब्येयियस म्हणाले की, 'मिठाचं सेवन कमी करण्यासाठी आणि लोकांना चांगला आहाराचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार गेला पाहिजे'.

ते पुढे म्हणाले की, 'खाद्य आणि पेय उद्योगाला प्रोसेस्ड फूडमध्ये सोडिअमचं प्रमाण कमी करावं लागेल. खाण्या-पिण्याच्या ६४ पदार्थांबाबत WHO ने एक नवा बेंचमार्क तयार केला आहे. याच्या माध्यमातून १९४ सदस्य देशातील अधिकाऱ्यांना जागरूक केलं जाईल. जेणेकरून ते खाद्य-पेय पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांना मॉनिटर करू शकतील.

किती खावं मीठ?

उदाहरण द्यायचं तर प्रति १०० ग्रॅम बटाट्याच्या चिप्समध्ये ५०० मिलि ग्रॅम सोडिअम असावं. बेंचमार्कनुसार, पाईज आणि पेस्ट्रीजमध्ये १२० मिली ग्रॅम आणि मीटमध्ये ३६० मिली ग्रॅम सोडिअम असावं. WHO ने सांगितले की, 'खाण्यात प्रमाणापेक्षा जास्त सोडिअम घेतल्याने ब्लड प्रेशर वाढतं. याने हृदयरोगाचा धोकाही वाढतो.

कोणते आजार होतात?

WHO ने सांगितले की, जगभरात सर्वात जास्त मृत्यू हे हृदयरोगांमुळे होतात. जगात यामुळे ३२ टक्के मृत्यू याच कारणाने होतात. जास्त सोडिअमचं सेवन केल्याने लठ्ठपणा, किडनीशी संबंधित आजार आणि गॅस्ट्रिक कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होतात. WHO ने सांगितले की, लोकांनी दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी सोडिअमचं सेवन करावं.  

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य