शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

सकाळी नाश्ता न करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणारे गंभीर परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:03 IST

Breakfast Skipping Side Effects : तुम्हाला सुद्धा नाश्ता न करण्याची सवय असेल तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

Breakfast Skipping Side Effects : ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्ता आपला दिवसातील सगळ्यात महत्वाचा आहार असतो. त्यामुळेच नाश्त्यात नेहमीच हेल्दी पदार्थ खाण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. मात्र, काही लोक सकाळच्या नाश्त्यात इतकं महत्व देत नाहीत. पण त्यांना हे माहीत नसतं की, सकाळचा नाश्ता स्कीप करणं शरीरासाठी महागात पडू शकतं. तुम्हाला सुद्धा नाश्ता न करण्याची सवय असेल तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

अमेरिकन रोग नियंत्रण केंद्राच्या आकडेवारीनुसार, २०२५ ते २०१८ पर्यंत २० वर्षापेक्षा अधिक वयोगटाच्या १५ टक्के लोकांनी नियमित रूपाने नाश्ता करणं सोडलं. सकाळची धावपळ, उपवास किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न यामुळे हे चलन वाढलं. तर काही लोकांना दिवसाची सुरूवात जेवणाने करायची नसते.

नाश्ता न करण्याचे नुकसान

'जर्नल ऑफ न्यूरो रेस्टोरेटोलॉजी' मध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, सकाळचा नाश्ता न करणं भरपूर नकारात्मक प्रभाव टाकू शकतं. याने शरीरात तणाव निर्माण होतो, ज्यामुळे कार्टिसोल हार्मोन्स जास्त रिलीज होतात. याने पुढे जाऊन पोटावरील चरबी वाढते. नाश्ता न केल्याने लो ब्लड शुगरची समस्याही होते. कारण मेंदुला सकाळी खाण्याची गरज असते, जेव्हा ते मिळत नाही तेव्हा मेंदू स्पष्टपणे विचार करू शकत नाही. ग्लूकोजला मेंदुचं प्राथमिक ईंधन मानलं जातं.

एका रिसर्चनुसार, नाश्ता करणं सोडल्याने मेंदुच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव बघायला मिळतो. अभ्यासकांनी रिसर्चमध्ये सहभागी लोकांचे दोन ग्रुप केले. जेणेकरून नाश्ता सोडणाऱ्यांची तुलना नाश्ता करणाऱ्यांसोबत करता यावी.यात सहभागी लोकांचा एमआरआय करण्यात आला. ज्यात नाश्ता न करणाऱ्या लोकांचा मेंदू आकुंचन पावलेला दिसला. जो डिमेंशियाच्या लक्षणाचा भाग आहे. त्याशिवाय ब्लड टेस्ट करण्यात आली. त्यात काही न्यूरो डिजनरेशन बायोमार्करचा स्तर त्या लोकांमध्ये अधिक होता जे नाश्ता स्कीप करत नव्हते. अशात डिमेंशियापासून बचाव करण्यासाठी नाश्ता आवश्यक आहे. 

सकाळचा नाश्ता स्कीप केल्याने व्यक्ती डिमेंशियाचा शिकार होऊ शकतो. डिमेंशिया मेंदुसंबंधी एक आजार आहे. यात मेंदुच्या कोशिकांचं नुकसान होतं आणि समजण्या-विचार करण्याची क्षमता कमी होते. डिमेंशियामध्ये स्मरणशक्ती, निर्णय घेण्याची क्षमता आणि शिकण्याची क्षमता प्रभावीत होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य