Amla juice : आवळा खाण्याचे किंवा आवळ्याचा ज्यूस पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्वचा चमकदार करण्यास, केसांची वाढ होण्यास, शरीरातील आयर्नची कमतरता भरून काढण्यास आवळ्याची मदत मिळते. आवळा खाण्याचे वेगवेगळे फायदे असले तरी याच्या सेवनाचे काही नुकसानही आहेत. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
कुणी पिऊ नये आवळ्याचा ज्यूस?
- किडनीसंबंधी समस्या असलेल्या लोकांनी आवळ्याच्या ज्यूसचं सेवन करू नये. कारण या फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम असतं, जे किडनीच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं.
- थायरॉईडच्या रूग्णांसाठी सुद्धा आवळ्याचा ज्यूस सेवन करणं घातक ठरू शकतं. कारण यात आयोडिन असतं, जे थायरॉईडमध्ये चांगलं मानलं जात नाही.
- ज्या लोकांना पोटासंबंधी समस्या आहे, त्यांनीही आवळ्याच्या ज्यूसचं सेवन करू नये. याने पोटात जळजळ आणि अॅसिड रिफ्लक्स होऊ शकतं.
- तसेच गर्भावस्थेतही आवळ्याच्या ज्यूसचं सेवन टाळलं पाहिजे. याने समस्या वाढू शकतात.
- त्याशिवाय तुम्ही सर्जरीआधी किंवा नंतर आवळ्याच्या ज्यूसचं सेवन करू नये. असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. याने ब्लीडिंग जास्त होण्याचा धोका असतो.
आवळ्याचा ज्यूस पिण्याचे फायदे?
1) वजन कमी करण्यास फायदेशीर
आवळ्यात भरपूर प्रमाणात अमीनो अॅसिड असतं. ज्याच्या मदतीने शरीराचा मेटाबॉलिक रेट चांगला राहतो. यामुळे पोट आणि कंबरेच्या आजूबाजूची चरबी कमी होऊ लागते. हेच कारण आहे की, आवळ्याच्या पाण्याला वेट लॉस ड्रिंक मानलं जातं.
2) डायबिटीसमध्ये फायदेशीर
जे लोक डायबिटीसने ग्रस्त आहेत त्यांना त्यांच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. तसं केलं नाही तर त्यांना इतर गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. सकाळी उठून आवळ्याचं पाणी प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल केली जाऊ शकते.
3) त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, आवळ्याचा वापर अनेक ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये केला जातो. सौंदर्य वाढवण्यासाठी याचा फायदा होतो. पिंपल्स आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी आवळ्याचं पाणी प्यायला हवं. सोबतच मजबूत आणि शायनी केस मिळवण्यासाठी तुम्ही आवळ्याची मदत घेऊ शकता.
कसं तयार कराल आवळ्याचं पाणी?
आवळ्याचं पाणी तयार करण्यासाठी सर्वातआधी तुम्ही एक चमचा आवळ्याचं पावडर घ्या आणि एक ग्लास पाण्यात मिक्स करा. काळजी घ्या की, पावडर पाण्यात चांगल्याप्रकारे मिक्स करा. नंतर ते गाळून या पाण्याचं सेवन करा.