Coconut Water Side Effects : हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतं. यातील पोषक तत्वांमुळे नारळ पाणी एक नॅचरल इलेक्ट्रोलाइट ड्रिंक बनतं. तसेच नारळ पाण्यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमसारखे महत्वाचे मिनरल्सही भरपूर असतात.
नारळ पाणी तसं तर सगळ्यांसाठीच हेल्दी असतं. मात्र, अनेक फायदे असूनही नारळ पाणी काही लोकांसाठी नुकसानकारक असतं. आरोग्यासंबंधी काही समस्या किंवा स्थितींमध्ये नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. असं केलं नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. अशात कोणत्या लोकांसाठी नारळ पाणी नुकसानकारक ठरू शकतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तेच आज जाणून घेऊया...
डायबिटीसने पीडित रूग्ण
जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल तर नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण नारळ पाण्यात नॅचरल शुगर असते, ज्यामुळे याचं सेवन केल्याने डायबिटीसच्या रूग्णांमध्ये ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.
किडनीची समस्या असेल तर...
नारळ पाण्यामध्ये हाय पोटॅशिअम असतं. ज्यामुळे किडनीची समस्या असलेल्या लोकांसाठी हे नुकसानकारक ठरू शकतं. किडनीची समस्या असलेल्या लोकांनी जर नारळ पाणी प्यायलं तर त्यांना हायपरकेलेमिया होण्याचा धोका असतो.
हाय ब्लड प्रेशर असलेले
नारळ पाण्यात सोडिअमचं प्रमाणही भरपूर असतं. याने ब्लड प्रेशर वाढू आणि कमी होऊ शकतं. त्यामुळे नारळ पाणी ब्लड प्रेशर कमी करण्याचं औषध घेणाऱ्या लोकांनी नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे.
ज्यांची सर्जरी झाली आहे
सर्जरी दरम्यान आणि नंतर ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यात होणारी अडचण दूर करण्यासाठी ठरलेल्या सर्जरीच्या कमीत कमी एक आठवडाआधी नारळ पाणी पिणं बंद केलं पाहिजे.