Side Effects of Moringa: शेवग्याच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. याचं सेवन केल्याने अनेक समस्या दूर होतात किंवा शरीराला फायदे मिळतात हे तुम्ही ऐकलं असेलच. पण तरीही शेवग्याच्या पानांची भाजी किंवा पावडरचं सेवन केल्याने काही लोकांना नुकसान होऊ शकतं. अशात कुणी शेवग्याच्या पानांचं सेवन करू नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पचनक्रिया खराब असलेल्यांनी
शेवग्याच्या सेवनाने डायजेशन बिघडू शकतं. जर याचं जास्त सेवन केलं तर यात असलेल्या लॅक्सेटिव तत्वाने उलटी किंवा जुलाब होण्याचा धोका असतो. त्याशिवाय बाउल मुव्हमेंट अॅक्टिव करण्यासाठी लॅक्सेटिव नावाचं तत्व भूमिका बजावतं. अशात लूज मोशनची समस्या होते.
उलटी किंवा मळमळ
अनेकांना शेवग्याची टेस्ट किंवा वास आवडत नाही. अशात ज्यांना असं होतं त्यांनी याचं सेवन करणं टाळलं पाहिजे. कारण याने तुम्हाला उलटी किंवा मळमळ होऊ शकते.
हृदयरोग असलेल्यांसाठी नुकसानकारक
ज्या लोकांना नेहमीच लो ब्लड प्रेशरची समस्या असते, त्यांच्यासाठी शेवग्याचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. याच्या पानांमध्ये एल्कलॉइड नावाचं तत्व आढळतं जे हार्ट बीट स्लो आणि ब्लड प्रेशर कमी करू शकतं. यामुळे हृदयरोग असलेल्यांनी याचं सेवन करणं टाळलं पाहिजे.
गर्भवती महिलांनी टाळावं
ज्या महिला गर्भवती आहेत किंवा स्तनपान करतात त्यांनी शेवग्याच्या शेंगाची, पानांची भाजी किंवा पावडरचं सेवन करू नये. अनेक एक्सपर्ट सांगतात यामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो. मासिक पाळी दरम्यानही याचं सेवन टाळलं पाहिजे. कारण याने शरीरात पित्त दोष वाढतो.
अजून कुणी टाळावं
थायराईड आणि डायबिटीस असलेल्या लोकांनी शेवग्याचं सेवन करणं टाळलं पाहिजे. असं सांगण्यात येतं की, या आजारांचं औषध घेत असलेल्यांसाठी शेवग्याचं सेवन करणं चांगलं नाही. तरी तुम्हाला शेवग्याचं सेवन करायचं असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.