नवी दिल्ली : भारतातील काही शहरे आणि राज्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणांची (Coronavirus Infection) एक पातळी गाठल्यानंतर बदल झाला नसला तरी धोका अजूनही कायम आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यावर आणि परिस्थितीनुसार पावले उचलण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वरिष्ठ अधिकारी पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले होते की, देशातील काही ठिकाणी कोविड संसर्गाच्या घटनांमध्ये घट किंवा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत, परंतु हा ट्रेंड लक्षात घेणे आवश्यक आहे.
भारतातील कोरोना व्हायरस संसर्गाच्या प्रकरणांमध्ये कोणताही बदल होत नसल्याच्या प्रश्नावर, जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया क्षेत्राच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितले की, कोरोनाचा धोका कायम आहे आणि सध्या संसर्ग पसरण्याच्या दरापेक्षा वेगळे आहे. कोणताही देश धोक्याच्या बाहेर नाही.
"काही शहरे किंवा राज्यांमध्ये संसर्गाची प्रकरणे स्थिर असली तरी, संकट कायम आहे. आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. संक्रमणाचा प्रसार रोखणे, सार्वजनिक आरोग्य परिस्थितीनुसार पावले उचलणे आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवणे यावर आमचे लक्ष केंद्रित केले पाहिजे. या महामारीमध्ये सर्व देशांनी हेच करणे आवश्यक आहे", असे डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी 'पीटीआय-भाषा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
जागतिक महामारी आता स्थानिक पातळीवर पोहोचली आहे का? असा सवाल केला असता डॉ. पूनम खेत्रपाल सिंग म्हणाल्या की, "आम्ही अजूनही जागतिक महामारीच्या स्थितीत आहोत आणि आमचे लक्ष संसर्गाचा प्रसार रोखणे आणि जीव वाचवणे यावर केंद्रित असले पाहिजे. स्थानिक महामारीचा अर्थ असा नाही की व्हायरस चिंतेचे कारण नाही आहे."
याचबरोबर, कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉनची डेल्टा व्हेरिएंटसोबत तुलना करताना डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितले की, ओमायक्रॉन श्वसनमार्गाच्या वरच्या भागाला फुफ्फुसापेक्षा अधिक वेगाने संक्रमित करतो, त्यामुळे व्हायरसचा हा प्रकार वेगाने पसरत आहे. दरम्यान, देशात 21 जानेवारी रोजी संसर्गाची 3,47,254 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती, त्यानंतर दैनंदिन प्रकरणांमध्ये घट होत आहे. विशेषत: महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, ओडिशा, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये संसर्गाची प्रकरणे आणि दर कमी झाला आहे.