कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरिअंट मागच्या डेल्टा व्हेरिअंटच्या तुलनेत कमी घातक आहे. आता वैज्ञानिकांनी कोरोनाच्या पुढच्या स्ट्रेनसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, कोरोना विषाणूचा पुढचा व्हेरिअंट ओमायक्रॉनपेक्षाही अधिक संसर्गजन्य असू शकतो. मात्र, पुढचा व्हेरिअंट जीवघेणा असेल की नाही, यावरही वैज्ञानिकांनी भाष्य करणे आवश्यक आहे.
WHO मधील कोरोनाच्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सोशल मिडिया चॅनल्सवर एक लाइव्ह चर्चेदरम्यान म्हटले आहे, की 'हेल्थ बॉडीने गेल्या आठवड्यात जवळपास 2 कोटी 10 लाख प्रकरणे नोंदविली आहेत. वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या साप्ताहिक रुग्णसंख्येने हा नवा वर्ल्ड रेकॉर्डच बनवला आहे.' मात्र, हा गत सर्वच व्हेरिअंट्स एवढा घातक नाही. जे येताच रुग्णालयांत रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढायला लागले होते.
केरखोव्ह म्हणाल्या, 'पुढचा व्हेरिअंट ऑफ कन्सर्न अधिक शक्तीशाली असले. याचा अर्थ याचा ट्रांसमिशन रेट अधिक असेल आणि तो संपूर्ण जगात पसरत असलेल्याय सध्याच्या व्हेरिअंटला मागे टाकेल. एक मोठा प्रश्न असाही आहे, की भविष्यात येणारे व्हेरिअंट अधिक घातक असतील की नाही,' एक्सपर्ट्सनी अशा थेरीवर विश्वास ठेवणाऱ्यांना इशारा दिला आहे. यात त्यांनी, व्हायरस वेळेनुसार, सौम्य स्ट्रेनमध्ये म्यूटेट होईल आणि लोक मागच्या व्हेरिअंट्सच्या तुलनेत कमी आजारी पडतील, असे म्हटले आहे.
“कोरोनाचा पुढचा व्हेरिअंट सौम्य असेल, अशी अपेक्षा आपण निश्चितपणे करू शकतो. पण प्रत्यक्षात तसे होईलच याची शाश्वती नाही. म्हणूनच लोकांनी कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. याशिवाय कोरोनाचा पुढचा म्युटेंट लसीच्या प्रोटेक्शनवरही मात करणारा असू शकतो. तसेच तो लसीपासून तयार होणाऱ्या इम्यूनिटीवरही प्रभाव टाकू शकतो," असेही एक्सपर्ट्सनी म्हटले आहे.