कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता जागतिक आरोग्य संघटनेनं सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस घेतल्यानंतरही सावधगिरी बाळगायला हवी. म्हणजेच कोरोनाविरुद्धच्या लढाईत कुठेच आपल्या निष्काळजीपणा करून चालणार नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हायरस ब्राझिलप्रमाणे इतर देशातही पसरू शकतो.
WHO च्या आपात्कालीन विभागाचे तज्ज्ञ माईक रेयान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''आम्हाला असं वाटतंय की, या माहामारीपासून अजूनही आपली सुटका झालेली नाही. सगळ्याच देशांना अधिक सर्तक राहावं लागणार आहे. याशिवाय तिसऱ्या किंवा चौथ्या लाटेशीचाही सामना करावा लागू शकतो.''
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार पुन्हा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. रेयान यांनी सांगितले की, ''बहुतेक सर्व देशांमध्ये लसीच्या पुरवठ्यामुळे ही लढाई जिंकण्याची आशा नक्कीच निर्माण झाली आहे, परंतु यामुळे कोरोनाच्या प्रसाराबाबत आणि नियमांबाबत निष्काळजीपणा करणं महागात पडू शकतं. ब्राझीलसह जगातील सर्व देशांनी यावेळी अतिरिक्त खबरदारी घेण्याची गरज आहे.''
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस डॅनॉम गेबेरिओस यांनीही ब्राझीलच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगणासह इतर काही राज्यांना निरिक्षणाखाली ठेवलं जाणार आहे.
मुलाच्या नाकात ८ वर्षांपासून अडकली होती 'बंदुकीची गोळी', डॉक्टरांनी असे केले उपचार!
ब्रिटन, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेतून कोविड -१९ च्या नवीन स्ट्रेनची प्रकरणं समोर आली आहेत. शुक्रवारी देशभरातून कोरोनाचे १८ हजार ३२७ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत १०८ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. सावधान! तुम्हीसुद्धा जेवता जेवता पाणी पिताय का? मग शरीराचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं