शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

जगासाठी खूप केलं, आता स्वत:साठी!...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 4:53 PM

स्वत:कडे बघा, स्वत:ला वेळ द्या.. शेवटी तेच उपयोगी पडणार आहे..

ठळक मुद्देरोज पुरेशी झोप घ्या. बघा, रोजच्यापेक्षा तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं की नाही ते?आहारात रोज मल्टिव्हिटॅमिनचा समावेश असेल याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.हेल्दी डाएटकडे वळा. चिप्सऐवजी फळं खा, कोल्ड्रिंकच्या आहारी जाण्यापेक्षा पाण्याचा जास्त वापर करा.आरोग्याची काहीही तक्रार नसली तरी नियमितपणे चेकअप करीत जा.

- मयूर पठाडेआरोग्याची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं? जिममध्ये जाऊन व्यायाम करायचा? ग्राऊंडवर पाय दुखेपर्यंयत रनिंग करायची? वजनं उचलायची? कुठला खेळ खेळायचा?...या साºया गोष्टी तुम्ही करीत असाल तर केव्हाही उत्तमच, पण ज्यांना यातलं काहीही करायचं नसेल आणि निदान आत्ता सुरुवातीला तरी सुखातला आपला जीव ‘दु:खात’ टाकून अंगातला घामटा काढायचा नसेल तर काही अगदी सोप्या गोष्टीही आहेत. त्या कोणत्या हे आपण गेल्यावेळी पाहिलं.आता पाहू या आणखी काही सोप्या गोष्टी, ज्यानं तुमची तब्येत अगदी ठणठणीत राहू शकेल.काय आहेत आरोग्याच्या टिप्स?१- झोपायला सगळ्यांनाच आवडतं, पण खरंच रोज घेता तुम्ही पुरेशी झोप? टेन्शनच्या कामाच्या रामरगाड्यात येते तुम्हाला नीट, शांत झोप? पहिल्यांदा रोज पुरेशी झोप घ्या. कामाचं टेन्शन सोडा आणि व्यवस्थित झोप घ्या. बघा, रोजच्या पेक्षा तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं की नाही ते?२- रोज एकच एक प्रकारचं जेवण करू नका. आहारात रोज मल्टिव्हिटॅमिनचा समावेश असेल याकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष द्या.३- बºयाचदा चटकमटक खाण्याकडे आपला कल असतो. चिप्स, जंक फूड याकडे अगदी एकदम जरी पाठ फिरवता नाही आली, तरी असे पदार्थ हळूहळू पूर्णपणे सोडा आणि हेल्दी डाएटकडे वळा. चिप्सऐवजी फळं खा, कोल्ड्रिंकच्या आहारी जाण्यापेक्षा पाण्याचा जास्त वापर करा.४- जास्त वेळा कधीही उपाशी राहू नका. आपल्या जेवणाच्या वेळा नीट प्लॅन करा आणि दिवसातून किमान चार वेळा तरी ठराविक वेळा आपल्या पोटात हेल्दी फूड जाईल याचं प्लॅनिंग करा.५- ‘मला काय धाड भरतेय?’ म्हणून प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याची काहीही तक्रार नसली तरी नियमितपणे चेकअप करीत जा.६- सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांसाठी, जगासाठी पळत असताना आपल्या स्वत:कडेही लक्ष द्या. स्वत:साठी आवर्जून वेळ काढा.जमेल एवढं. जमायलाच हवं.. आणि तुम्ही ते आता तरी जमवाल असा विश्वास आहे. बघा करून. जगा स्वत:साठी.