(Image Credit : nccs.com.sg)
अन्न नलिकेचा कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा एसोफॅगल कॅन्सर म्हणूनही ओळखला जातो. अन्न नलिकेमध्ये इन्फेक्शन जर सतत होत असेल हा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. एसोफॅगल कॅन्सर किंवा अन्न नलिकेचा कॅन्सर जास्तकरून पुरुषांना होतो. सामान्य भाषेत या कॅन्सरला घशाचा कॅन्सरही म्हणतात. पण हा कॅन्सर घशाच्या कॅन्सरपेक्षा फार वेगळा असतो. अन्न नलिकेचा कॅन्सर हा जास्त आशिया आणि आफ्रिका देशांमध्ये जास्त आढळतो.
किती प्रकारचा असतो अन्न नलिकेचा कॅन्सर
अन्न नलिकेला होणारा कॅन्सर हा पेशींमध्ये असतो, त्यामुळे याला त्याला पेशीच्या आधारावर नाव दिलं जातं. एडेनोकारिसीनोमा एसोफॅगस याचा सर्वात मुख्य प्रकार आहे. खाण्याच्या नलिकेत होणारा कॅन्सर हा जास्तकरून एसोपॅगसच्या खालच्या बाजूला असतो. स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, हा अन्न नलिकेच्या कॅन्सरचा दुसरा सर्वात मोठा प्रकार आहे. हा कॅन्सरला अन्न नलिकेमधील पसरलेल्या आणि सुक्ष्म पेशींमध्ये होतो.
लक्षणे
अन्न नलिकेचा कॅन्सर हा ज्यांना नेहमी नेहमी घशामध्ये इन्फेक्शन होतं, त्यांना होण्याचा धोका अधिक असतो.
गिळण्यात नेहमी त्रास होत असेल कॅन्सर होण्याची शक्यता असते.
छातीमध्ये वेदना किंवा जळजळ होणे हे अन्न नलिकेच्या कॅन्सरचं लक्षण आहे.
सतत खोकल्याची समस्या होणे किंवा घशातून आवाज येणे सुद्धा अन्न नलिकेचा कॅन्सर होण्याचं लक्षण आहे.
कुणाला होऊ शकतो हा कॅन्सर?
नेहमी अल्कोहोलचं सेवन केल्याने अन्न नलिकेचा कॅन्सर होण्याचं मुख्य कारण होऊ शकतं. अॅसिड रिफ्लक्सची समस्या असेल तर हा कॅन्सर होऊ शकतो. फार जास्त गरम पाणी किंवा तरल पदार्थ प्यायल्याने सुद्धा अन्न नलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. धुम्रपान केल्यानेही अन्न नलिकेचा कॅन्सर होऊ शकतो.
कसा कराल बचाव?
अन्न नलिकेच्या कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर धुम्रपान बंद करायला हवं. अल्कोहोलचं सेवनही कमी करायला हवं. फार जास्त प्रमाणात अल्कोहोल सेवन करू नये. तसेच हेल्दी लाइफस्टाइलचा अंगीकार करा. आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करा. दिवसातून कमीत कमी दोन फळं खावीत.