शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

कान का गरम होतात? जाणून घ्या काय करणे योग्य किंवा अयोग्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 2:33 PM

बरेचदा आपले कान गरम होतात. कान गरम झाल्याने आपल्याला नेमके काय झाले आहे याची चिंता आपल्याला वाटू शकते. काहीवेळा कान गरम होण्यासोबतच लालही होतात. अशावेळी काय करावे?

बरेचदा आपले कान गरम होतात. कान गरम झाल्याने आपल्याला नेमके काय झाले आहे याची चिंता आपल्याला वाटू शकते. काहीवेळा कान गरम होण्यासोबतच लालही होतात. तसेच कानांना सुजही येते. याची अनेक कारण असू शकतात. पण घाबरण्याचं कारण नाही यावर उपायही आहेत. जाणून घेऊया कान का गरम होतात आणि त्यावरचे उपाय काय?

कसे समजते कान गरम झाले आहेत?कानात काही इन्फेक्शन झाले आहे तर कान गरम होऊ शकतात. तसेच कानात दुखणे, स्त्राव होणे, ऐकायला न येणे अशी लक्षणे दिसू लागतात. जर उन्हामुळे कान गरम झाले असतील तर कानाची त्वचा लालसर दिसू लागते.

कान का गरम होतात?

  1. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे कान गरम होऊ शकतात. 
  2. गरम किंवा थंड हवेमुळेही कान गरम होऊ शकतात.
  3. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मानसिक स्थितीमुळेही कान गरम होऊ शकतात. जर तुम्हाला भरपूर राग आला असेल किंवा एन्झाईटी वाटत असेल तर त्यामुळेही कान गरम होऊ शकतात.
  4. व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळेही कान गरम होऊ शकतात.
  5. हार्मोन्समध्ये बदल झाल्याने कान गरम होऊ शकतात.
  6. मेनॉपॉज किंवा केमोथेरपीच्या दरम्यानही तुमचे कान गरम होऊ शकतात.

उपाय काय?

  1. तुमचे कान गरम होत असतील तर साफसफाईवर लक्ष द्या. कानात जमलेल्या मळामुळे इअर इन्फेक्शन होते. त्यामुळे कान गरम झाल्यासारखे वाटतात.
  2. कानाचा साफसफाईसाठी एक दोन महिन्यांनंतर डॉक्टरकडे जा
  3. कान दुखत असतील तर कानात तेल घालु नका डॉक्टरांनी दिलेले इअरड्रॉप टाका.
  4. कानाला खाज येत असेल तर कान साफ करण्यासाठी टोकदार वस्तूंचा वापर करू नका. यामुळे कानाच्या नसांना इजा होण्याची शक्यता असते.
  5. कान गरम होण्यापासून वाचण्यासाठी इन्फेक्शनमुक्त ठेवा. त्यामुळे विशेष काळजी घ्या की कान ओले राहणार नाहीत.
  6. जास्त वेळ गाणी एकू नका किंवा जास्त वेळ फोनवर बोलुही नका. बाथरुममध्ये असताना फोनचा वापर करू नका यामुळे तुमच्या कानांना इन्फेक्शन होईल. 
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स