Sleep Health Benefits : कमी झोप घेणं तुमच्या शरीरासाठी फाय नुकसानकारक आहे. यामुळे आळसासोबतच अनेक आजारांचा धोकाही वाढतो. वॉशिंग्टन यूनिवर्सिटीच्या अभ्यासकांनी मनुष्यांच्या झोपेच्या गरजेवर एक रिसर्च केला आहे.
मनुष्यांना झोप का येते?
पृथ्वीवर असे अनेक जीव आहेत जे कधीच झोपत नाही किंवा काही मिनिटांसाठी डोळे बंद करतात. पण मनुष्यांना रोज रात्री किमान 7 ते 8 तासांची घेणं गरजेचं आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, मनुष्यांसाठी झोप इतकी महत्वाची का आहे? याच विषयावर सेंट लुइसयेथील वॉशिंग्टन यूनिवर्सिटीच्या अभ्यासकांनी एक रिसर्च केला.
'झोप कमी घ्याल तर मराल'
वाशिंग्टन यूनिवर्सिटीचे असिस्टेंट प्रोफेसर Keith Hengen यांनी सांगितलं की, झोप घेतली नाही तर तुम्ही मराल. झोप पाणी आणि जेवणासारखीच गरजेची आहे. रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, मेंदू एखाद्या कॉम्प्युटरसारखं काम करतो आणि झोपेमुळे याचं ऑपरेटिंग सिस्टीम नॅचरली रिस्टार्ट होतं. यामुळे फ्रेश वाटतं आणि सक्रियता वाढते.
इम्यून सिस्टीम मजबूत होतं
ऑफिस ऑफ डिजीज प्रीवेंशन अॅंड हेल्थ प्रोमोशननुसार, पुरेशी झोप घेतल्याने इम्यून सिस्टीम मजबूत होतं. याने छोट्या-मोठ्या इन्फेक्शनमुळे तुमचा जास्त आजारी पडण्याचा धोकाही कमी होतो.
शरीराचं वजन कमी होतं
झोप तुमच्या मेटाबॉलिज्मसाठी आवश्यक आहे. तुम्ही जे खाता ते ठीकपणे पचन होऊन शरीराला लागतंआणि फॅट कमी तयार होतं. लठ्ठपणापासून वाचवण्यासाठी हे फार महत्वाचं आहे.
तणाव कमी होतो
झोप घेत असताना मेंदू रिलॅक्स होतो. जर झोप कमी झाली तर एंझायटी, आळस आणि डिप्रेशनचं कारण बनते. आनंदी आणि फ्रेश राहण्यासाठी रोज 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे.
आजारांचा धोका कमी
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, कमी झोप घेतल्याने हृदयरोग आणि डायबिटीसचा धोकाही वाढतो. खासकरून आजारांच्या रूग्णांना झोप पूर्ण घेण्याचा सल्ला दिला जातो.
जास्त फोकस आणि प्रोडक्टिविटी
जे लोक पुरेशी झोप घेतात त्यांचा फोकस आणि प्रोडक्टिविटी चांगली आढळून आली आहे. झोप घेतली नाही तर तुम्हाला आळस आणि कमजोरी जाणवू शकते.