डास जेव्हा मनुष्यांना चावतात तेव्हा त्यांच्या चावण्यामुळे अनेक प्रकारचे जीवघेणे आजार होतात. तसे तर डास सर्वांनाच चावतात. पण एका रिसर्चनुसार हा खुलासा झाला आहे की, 20 टक्के लोक असे असतात ज्यांच्याकडे डास जास्त आकर्षित होतात. म्हणजे डास इतरांपेक्षा या लोकांना जास्त चावतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, डास काही लोकांना जास्त का चावतात.
1) डार्क रंगांचे कपडे पाहून चावतात डास
सर्वसाधारणपणे डास कुणालाही पाहिल्यावर किंवा त्या व्यक्तीच्या विशिष्ट वासामुळे त्याला चावतात. तज्ज्ञांनुसार, डासांची नजर फार चांगली असते. खासकरुन दुपारच्या वेळी ते मनुष्यांना शोधून शोधून चावतात. जेव्हा तुम्ही खासकरुन डार्क रंगांचे कपडे जसे की नेव्ही ब्लू, ब्लॅक किंवा लाल रंगांचे कपडे परिधान केल्यास तुम्हाला डास सहज शोधून काढतात.
2) या रक्तगटाच्या लोकांना करतात टार्गेट
रक्त हेच डासांसाठी सर्वकाही असतं. डासांसाठी रक्त हे एकप्रकारे अमृतच असतं. फिमेल डास अंडे देण्यासाठी मनुष्यांच्या रक्तातील प्रोटीन मिळवतात. यातही काही आश्चर्य नाहीये की, डासांसाठी काही वेगळे रक्तगटही गरजेचे असतात. ओ आणि ए रक्तगट असलेल्या लोकांना डास अधिक चावतात. तर बी रक्तगट असलेल्यांना डास सामान्य रुपाने चावतात.
3) कार्बन डाय-ऑक्साईड गॅस करते आकर्षित
डासांकडे इतकी समज असते की, ते 166 फूटच्या अंतरावरुन सुद्धा कार्बन डाय ऑक्साईड गॅसला ओळखू शकतात. या गॅसकडे डासांचं जास्त आकर्षण असतं. मनुष्य हे ऑक्सिजन घेऊन कार्बन डाय ऑक्साईड सोडतात. याच कारणामुळे डास हे मनुष्यांच्या नाकाजवळ जास्त फेऱ्या मारतात.
4) गरमी आणि घाम
कार्बन डाय ऑक्साईडसोबतच आणखीही काही असे घटक आहेत ज्याकडे डास आकर्षित होतात. गरमीच्या दिवसात शरीरातून निघणाऱ्या घामातून लॅक्टिक अॅसिड, यूरिक अॅसिड आणि अमोनिया हे घटक डासांना आकर्षित करतात. ज्या लोकांना जास्त घाम येतो त्यांना डास जास्त चावतात.
5) गर्भवती महिलांना
एका रिसर्चमधून खुलासा झाला आहे की, एक गर्भवती महिला एका सामान्य महिलेपेक्षा जास्त कार्बन डाय ऑक्साईड बाहेर सोडते. त्यामुळे गर्भवती महिलांकडेही डास जास्त आकर्षित होतात.