जर तुम्ही वजन कमी करत असाल, तर जास्तीत जास्त लोक तुम्हाला भात न खाण्याचा सल्ला देतात. कारण असं मानलं जातं की, भात खाल्ल्याने वजन वाढतं. यामुळे भात आवडणारे लोकही भात खात नाही. भात जगात सगळ्यात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. भारतात भात सगळ्यात जास्त खाल्ला जातो, खासकरून साऊथ इंडियात.
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, साऊथ इंडियातील अनेक फेमस डिश जसे की, इटली, डोसा, उत्तप्पा इत्यादींमध्ये तांदळाचा वापर केला जातो. त्याशिवाय येथील लोक जेवणातही भात भरपूर खातात. आता प्रश्न हा आहे की, जर भात खाल्ल्याने वजन वाढतं तर मग येथील लोक लठ्ठपणाचे शिकार का नाहीत?
भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं?
सगळ्यात आधी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, खरंच भात खाल्ल्याने वजन वाढतं का? संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्राचे संस्थापक आणि आयुर्वेद एक्सपर्ट महारुद्र शंकर शेटे यांच्यानुसार, पांढऱ्या तांदळाला रिफाइंड केलं जातं. यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं. यात हाय ग्लायसेमिक इंडेक्सही जास्त असतो आणि रिफायनिंग प्रोसेस दरम्यान फायबरसहीत अनेक मिनरल्स नष्ट होतात. हेच कारण आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती पांढरा भात खातात तेव्हा त्यांच्या शरीरात शुगर लवकर तुटते आणि रक्तात मिक्स होते. हेच मुख्य कारण आहे की, जास्तीत जास्त लोक लठ्ठपणा किंवा वजन वाढण्यासाठी पांढऱ्या भाताला जबाबदार मानतात.
साऊथ इंडियन लोक भात खाऊनही लठ्ठ का नाही?
एक्सपर्टने सांगितलं की, साऊथमधील लोक इतका भात खातात तरीही त्यांना काही होत नाही. इतर राज्यातील लोक थोडा भात खात असतील तरी त्यांचं वजन वाढतं. याचं एक मोठं कारण म्हणजे साऊथमध्ये तांदळाला पॉलिश केलं जात नाही. इतर राज्यांमध्ये पांढरा तांदूळ दोन ते तीन वेळा पॉलिश केला जातो. जो अनेक आजारांचं कारण ठरतो.
भात बनवण्याची योग्य पद्धत
एक्सपर्टने सांगितलं की, साऊथमध्ये भात बनवण्याची पद्धत त्यांना लठ्ठ होऊ देत नाही. साऊथमध्ये लोक सामान्य तांदळाचा वापर करतात आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भात शिजवण्यासाठी प्रेशर कूकरचा वापर करत नाहीत. ते पातेल्यात भात शिजवतात. पातेल्यात भात शिजवताना त्यात जो फेस येतो तो ते काढून टाकतात. मुळात तांदळाच्या पाण्यावर येणारा फेसच लठ्ठपणासहीत अनेक आजारांचं कारण बनतो. त्यामुळे भात नेहमी पातेल्यात शिजवा.
रोज किती भात खावा?
एक्सपर्ट्स मानतात की, तांदळांमध्ये पोर्शन कंट्रोलही फार गरजेचं आहे म्हणजे तुम्ही किती भात खात आहात यावर कंट्रोल ठेवला पाहिजे. केवळ भातच नाही तर तुम्ही काहीही जास्त खाल्लं तर तुमच्या शरीराला नुकसान होईल. अनेक राज्यांमध्ये कमीत कमी एक वेळा भात खाल्ला जातो.