(Image Credit : independent.co.uk)
हिवाळ्यात थंडी वाजणं स्वाभाविक आहे. पण इतरवेळीही रात्री झोपेत थंडी वाजणं सामान्य बाब नाहीये. झोप व्यक्तीसाठी तेवढीच गरजेची आहे, जेवढं श्वास घेणं आणि जेवण करणं. धावपळीच्या जीवनात थकवा जास्त जाणवतो. त्यामुळे शरीर ताजतवाणं ठेवणं गरजेचं आहे. हे केवळ चांगली झोप घेतल्यानेच शक्य होतं. तुम्हाला जर झोपेत थंडी वाजत असेल तर तुमची झोपही पूर्ण होत नाही. पण झोपेत थंडी वाजण्याची काही कारणे तुम्हाला माहीत असायला हवीत. चला जाणून घेऊ काही कारणे...
अनेकदा लोकांना ही समस्या कळून येत नाही, पण थंडीच्या दिवसात लवकर कळून येते. काही लोकांना उन्हाळ्यातही झोपेत थंडी वाजू लागते. अचानक थंडी वाजणे साधारण बाब नाहीये. तुमची झोप अचानक उघडते आणि तुम्हाला थंडी वाजू लागत असेल तर यामागे अनेक कारणे असू शकतात. रात्री झोपेत थंडी वाजणे म्हणजे शरीरात काहीना काही समस्या आहे.
तुमचं वजन
जर तुम्ही अंडरवेट असाल म्हणजे तुमचं वजन सामान्यापेक्षा कमी असेल तर अर्थातच तुमच्या शरीरात जास्त चरबी नसते. चरबीमुळे शरीरात गरमीची निर्मिती होते. रात्री तसंही झोपतेवेळी शरीराचं तापमान कमी होतं. शरीराचं टेम्प्रेचर गरम ठेवण्यासाठी काही इन्सुलेशनची गरज असते.
जर तुम्ही योग्य प्रमाणात आहार घेतला नाही तर तुमचा मेटाबॉलिज्म दर कमी होईल. ज्यामुळे तुमचं शरीर योग्य प्रमाणात ऊर्जा निर्माण करू शकणार नाही आणि तुमच्या शरीरात गरमी निर्माण होणार नाही. त्यासोबतच जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्हाला पोटाच्या आजूबाजूला गरमी लागेल. पण हाता-पायांपर्यंत ही गरमी पोहोचू शकत नाही. यामुळे प्रयत्न करा की, वजन नियंत्रित ठेवाल.
झोप पूर्ण न झाल्यामुळे
ऐकायला हे थोडं विचित्र वाटतं, पण शरीरात गरमी तयार न होण्याचं हेही एक कारण आहे. पुरेशा प्रमाणात झोप होत नसल्याने मेटाबॉलिज्म सुद्धा गरमी निर्माण करू शकत नाही.
आयर्नची कमतरता
शरीराला व्यवस्थित चालवण्यासाठी शरीरात आयर्नचं प्रमाण भरपूर असणं गरजेचं आहे. हे शरीरातील लाल पेशींद्वारे शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यात मदत करतात. सोबतच शरीरातील प्रत्येक पेशीने काम करावं ही सुद्धा आयर्नची जबाबदारी आहे. जर तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता असेल तर तुम्हाला झोपेत थंडी वाजेल.
ब्लड सर्कुलेशनची समस्या
जर तुमचे हात-पाय नेहमी थंडे राहत असतील तर याने तुमच्यातील रक्तप्रवाहाची कमतरता दिसून येते. असंही होऊ शकतं की, तुम्हाला शरीराच्या एका भागात थंड वाटत असावं. हा हृदयरोगाचा संकेतही असू शकतो.
महिलांना होते अधिक समस्या
तुम्हाला ही बाब हैराण करू शकते. पण अनेक रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, महिलांना पुरूषांच्या तुलनेत जास्त थंडी वाजते. सरासरी एका महिलेला पुरूषाच्या तुलनेत ३ डिग्री सेल्सिअस कमी तापमान जाणवतं.
कसा कराल बचाव
जर तुम्हाला झोपेत नेहमीच थंडी वाजत असेल, तर नेमक्या कारणांचा शोध घ्या. ही समस्या असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा. कारण या आजाराने तुमच्यात कमजोरी येऊ शकते. कमजोर शरीराल थंडी जास्त लागते.