शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

हिवाळ्यात सांधेदुखी का वाढते?, त्रासदायक ठरणारं हे दुखणं कसं टाळता येऊ शकतं?... जाणून घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 4:32 PM

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांकडे अधिक रक्तपुरवठा होतो. यामुळे सांध्यांना कमी रक्तपुरवठा होतो. सांधेदुखीमुळे आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम जाणवू शकतो.

सांधेदुखी आता खूप सामान्य बाब झाली आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर खूप गंभीर समस्या निर्माण होऊ शकते हे देखील तितकंच खरं आहे.  विशेषत: वृद्ध व्यक्तींना सांधेदुखीचा खूप त्रास होतो. जवळपास एक तृतीयांश वृद्ध व्यक्तींना हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास जाणवतो असा अहवाल समोर आला आहे. पण सांधेदुखीचा त्रास आता तरुणाईमध्ये देखील दिसून येऊ लागला आहे आणि त्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. त्यामुळे सांधेदुखीकडे दुर्लक्ष करता कामा नये. 

सांधेदुखीमुळे आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम जाणवू शकतो. तुमची टाच आणि पायांपासून ते खांदे आणि हातापर्यंत सांधेदुखी निर्माण होऊ शकते. यात गुडघेदुखी सर्वात सामान्य तक्रार आहे. त्यानंतर खांदेदुखी आणि कंबर दुखण्याच्याही तक्रारी जास्त आढळतात. 

ऑस्टियो आर्थरायटिस (O.A.): ऑस्टियो आर्थरायटिस हा अतिशय सामान्य प्रकार आहे.  वाढत्या वयामुळे सांध्यांमध्ये होणाऱ्या कमजोरीमुळे हा आजार होतो. वयानुसार तुमचं वजन फार जास्त असेल तर तुमच्या गुडघ्यांवर परिणाम होतो. या आजारात हिवाळ्यामुळे सांधे आणि स्नायूंचा ताठरपणा वाढतो. यामुळे तुमच्या दैनंदिन हालचाल आणि कामाचा वेग मंदावतो. 

रूमेटाइड अर्थराइटिस (Rheumatoid Arthritis): रुमेटाइड अर्थरायटिसचा साध्या सरळ आणि सोप्या भाषेतील अर्थ म्हणजे आमवात. जेव्हा तुमचं शरीर काही कारणांमुळे आपल्याच शरीरातील पेशींविरुद्ध काम करायला लागतं तेव्हा आमवाताची समस्या निर्माण होते. हिवाळा आणि उन्हाळ्यात आमवाताच्या वेदना वाढतात. यात तीव्र वेदना, सूज आणि कडकपणा जाणवतो. हिवाळ्यात ताण, चमक आणि इतर दुखापती शरीराला जास्त त्रास देतात. यामुळे तुमच्या दैनंदिन कामात संथपणा येतो. 

सांधेदुखी आणि हिवाळा यांच्यातील परस्पर संबंध:

सांधेदुखी आणि हिवाळा यांचा संबंध असल्याचं अनेक वर्षांपासूनच्या संशोधनातून दिसून आलं आहे. त्याबाबत भक्कम पुरावे आपल्याला देता येत नाहीत. पण, तज्ज्ञांनी काही सिद्धांत मांडले आहेत. ज्यामुळे हिवाळ्यात सांधेदुखी वाढते या दाव्याला अधिक बळ मिळतं. वातावरणातील हवेचा दाब कमी झाल्यामुळे स्नायू, सांधे किंवा जखमेच्या ऊतींना पटकन सूज येते आणि यामुळे वेदना वाढतात. हिवाळ्यात सांध्यांमधील द्रव अधिक घट्ट होतात आणि त्यामुळे सांध्यांमध्ये कडकपणा येतो आणि वेदना सुरू होतात, असंही एका अहवालातून समोर आलं आहे. 

थंड वातावरणामुळे स्नायू घट्ट होतात आणि हालचाल मंदावते. यातून सांधेदुखीला सुरुवात होते. हिवाळ्यात थंड वातावरणामुळे शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांकडे अधिक रक्तपुरवठा होतो. यामुळे सांध्यांना कमी रक्तपुरवठा होतो. सांध्यांमधील आवश्यक रक्ताचं प्रमाण जसजसं कमी होतं तसं वेदना सुरू होतात. 

वातावरणाचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो याचं गुपित सूर्यप्रकाशात देखील दडलं आहे. हिवाळ्यात सूर्यप्रकाश त्या मानानं कमी असतो. सूर्यकिरणं ही व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्रोत आहेत. त्यामुळे हिवाळ्यात व्हिटॅमिन-डीची पातळी कमी होते आणि सांधेदुखीचं कारण बनते.

 

सांधेदुखीवरचे उपाय  

हिवाळ्यात सांधेदुखी वाढते असं संशोधनातून समोर आलेलं असलं, तरी त्याचा सामना करण्यासाठी काही टिप्स देखील आहेत. हिवाळ्यात बाहेर जाताना टोपी, स्कार्फ आणि हातमोज्यांसह उबदार कपड्यांचा वापर करावा. तंग कपडे, लेगिंग्ज तुमच्या गुडघ्याच्या भागात अतिरिक्त उबदारपणा निर्माण करू शकतात. रक्ताभिसरण वाढविण्यासाठी आणि स्नायूंमध्ये मोकळेपणा आणण्यासाठी गरम पाण्याचा शेक देता येऊ शकतो. यासोबतच गरम पाण्यानं आंघोळ करणं फायदेशीर ठरतं. 

हिवाळ्यात व्यायाम करण्याचा कंटाळा करू नये. व्यायाम करण्याची इच्छा नसली तरी शरीराची हालचाल थांबवू नका. व्यायामामुळे तुमची हाडं आणि तुमच्या गुडघ्यांभोवतीचे स्नायू बळकट होतात. सांध्यांवरील दबाव कमी होतो. यात योगासनं अधिक फायदेशीर ठरू शकतात. योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढविण्यास मदत होते. याशिवाय गरम पाण्यात शांत बसून राहिल्यानंही शरीराला आराम मिळतो. 

दैनंदिन कामं करताना शरीरावर जास्त जोर येणार नाही, याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. क्षमतेपेक्षा अधिक जड सामान उचलण्याचा प्रयत्न करू नये. पौष्टिक आहार आणि निरोगी राहून काळजी घेता येते. सांध्यांवरील अतिरिक्त ताण तुमच्या वेदना वाढवू शकतो. Glucosamine, Chondroitin आणि व्हिटॅमिन D सारख्या सांध्यांचं बळ वाढवणाऱ्या औषधांनी मदत होऊ शकते. चरक फार्माच्या GO365 न्यूट्रा टॅबलेट्स संधिवात आणि सांधेदुखीसाठी गुणकारी आहेत. या गोळ्यांमधील ग्लुकोसामाइन आणि कॉन्ड्रोइटिन सांधेदुखीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यास मदत करतात. पुरेशी झोप घेणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण डोळे आणि शरीराचा आराम सांधेदुखीसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. वेदना जाणवू न देण्यासाठी नेहमी सकारात्मक राहून ज्या गोष्टींमध्ये तुमचं मन रमेल अशा गोष्टींना प्राधान्य देणं. जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करणं हा रामबाण उपाय ठरतो. 

 

विशेष म्हणजे, मिरचीत आढळणारा Capsaicin चा अंश सांधेदुखी आणि इतर परिस्थितींपासून तुम्हाला आराम देऊ शकतो. सांधेदुखीमुळे निर्माण होणाऱ्या वेदनांचे संकेत मेंदूपर्यंत पोहोचणार नाहीत आणि वेदना शमवणाऱ्या एंडोर्फिन नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होईल यासाठी Capsaicin महत्त्वाची भूमिका पार पाडतो. GO365 हे मलम याच Capsaicin नं समृद्ध आहे. हे इतर पांरपरिक पेनकिलर्सपेक्षा अधिक वेगानं आणि सुरक्षितपणे सांधेदुखीपासून आराम देण्याचं काम करतं.  

चरक फार्माबद्दल...

चरक फार्मा ही भारतातील आयुर्वेदिक औषधे तयारी करणारी प्रसिद्ध आणि प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी १९४७ पासून भारतात कार्यरत आहे व वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक उत्पादने तयार करते. आरोग्याशी संबंधित प्रॉडक्ट असल्यानं दर्जामध्ये कुठलीही तडजोड न करता, ग्राहकांना उत्तम प्रतीचं औषध उपलब्ध करणं, हा कंपनीचा प्रामाणिक उद्देश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चरक फार्माने आंतरराष्ट्रीय हर्बल हेल्थकेअर कंपनी म्हणूनही ओळख निर्माण निर्माण केली आहे.