(Image Credit : arogyanama.com)
जास्तीत जास्त घरांमध्ये गव्हाच्या पीठाचा वापर केला जातो. पण अनेक घरांमद्ये लोक गव्हाच्या पीठासोबतच बाजारीची भाकरीही मोठ्या आवडीने खातात. आजकाल तर बाजरीच्या पीठाची मार्केटमध्ये मोठी डिमांड वाढली आहे. आता तर हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यात तर बाजऱ्याच्या भाकरीचे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. ज्यांबाबत अनेकांना माहीत नसतं.
बाजऱ्याची पिठामुळे आपली पचनक्रिया मजबूत होण्यासोबतच आपला अनेक आजारांपासून बचावही होतो. बाजरीच्या पीठात फायबर आणि अमीनो अॅसिड मोठ्या प्रमाणात आढळून येतं. जर तुम्हाला तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणात पोषक तत्व द्यायचे असतील तर तुमच्या नेहमीच्या आहारात बाजऱ्याच्या भाकरीचा समावेश करा.
१) फायबर मोठ्या प्रमाणात असतं -
एक्सपर्टनुसार, बाजऱ्याचं पीठ ग्लूटेन फ्री असतं. यात फायबरचं प्रमाण भरपूर असतं. फायबर जास्त प्रमाणात असल्याने बराच वेळ भूक लागत नाही. जर तुम्ही याचा डाएटमध्ये नियमित समावेश केला तर तुम्ही सहजपणे वजनही कमी करू शकता. हे पिठ प्री-बायोटिकच्या रूपात काम करतं. डायबिटीसच्या रूग्णांनीही याचं सेवन केलं तर त्यांनाही याचे अनेक फायदे होतात.
२) हृदय राहतं चांगलं -
जर तुम्हाला हृदयरोग असेल तर तुम्ही बाजरीच्या भाकरीचा आहारात नक्की समावेश करा. बाजरीमध्ये मॅग्नेशिअम पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं. बाजरीमुळे ब्लड वेसल्स पसरण्यासही मदत मिळते. जर ब्लड प्रेशर रूग्णांनी बाजरीच्या भाकरीचं सेवन केलं तर यातील फायबर कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास मदत करतं.
३) डिटॉक्सिंग एजंट भरपूर -
एक्सपर्टनुसार बाजऱ्याच्या पीठात फायटिक अॅसिड, टॅनिन आणि फिनोलसारखे अॅंटी-ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्ही याचा डाएटमध्ये समावेश केला तर तुमचं वाढणारं वय कंट्रोलमध्ये राहतं. याने आपलं इम्यून सिस्टीम मजबूत होतं. रोज याचं सेवन केलं तर शरीरातील विषारी पदार्थ सहजपणे बाहेर निघतात.
४) डायबिटीस करा कंट्रोल -
बाजरीच्या पीठात फायबरचं प्रमाण अधिक असतं. जर डायबिटीसच्या रूग्णांनी याचं नियमितपणे सेवन केलं तर त्यांचा हा आजार कंट्रोलमध्ये राहतो. त्यांन भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम आणि ऊर्जा मिळते.
५) बाजरीमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड
बाजरी खाल्ल्याने बीपी, ट्रायग्लिसराइड्स किंवा हार्ट अटॅक सारख्या समस्यांचा धोका कमी राहतो. जर तुम्ही रोज याचं सेवन केलं तर आरोग्याला नियमित संरक्षण मिळतं. एक्सपर्टनुसार, बाजरीच्या पिठात इतर पीठांच्या तुलनेत ओमेगा २ फॅटी अॅसिड जास्त असतं.