आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्यांकडे आपण लक्षच देत नाही. या फारच सामान्य गोष्टी असतात ज्यावर कधी लक्षच दिलं जात नाही. मनुष्य खोकतात, छिंकतात, श्वास घेतात. जोपर्यंत या गोष्टींमध्ये काही समस्या होत नाही तोपर्यंत यावर लक्ष देत नाही. अशीच एक सामान्य क्रिया आहे पादणे म्हणजे गॅस सोडणे. तशी तर ही एक शरीराची सामान्य क्रिया आहे. पण लोक याबाबत बोलण्यास लाजतात.
सामान्यपणे कुणीही बाथरूममध्ये किंवा आजूबाजूला कुणी नसलं तेव्हा गॅस सोडतात. कधी आवाजासोबत तर कधी आवाज न आवाज न येऊ देता लोक गॅस सोडतात. पण ते कधी मान्य करत नाहीत. नुकतीच एका प्रोफेसरने गॅसबाबत एक साइंटिफिक माहिती दिली आहे. त्यांनी या गॅसच्या एका बेसिक फिचरकडे लोकांचं लक्ष वेधलं आहे. तुम्ही कधी नोटीस केलंय का की, आपण सोडतो तो गॅस नेहमीच गरम का असतो? आता याचं कारण समोर आलं आहे.
गरजेचं आहे पादणं
NYU लांगोने हेल्थटे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी डिव्हिजनचे प्रोफेसर लिसा गंझू यांनी गॅस गरम असण्याचं कारण सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, ही हवा शरीरातून अनेकदा निघते आणि प्रत्येकवेळी याचं टेम्परेचर वेगळं असतं. याच्या टेम्परेचरमुळेच याचा साउंडही वेगळा असतो. प्रोफेसर लिसा यांनी सांगितलं की, गॅस सोडणं ही आपल्या शरीराचं महत्वाचं फंक्शन आहे. पण लोकांनी या टॅबू बनवलं आहे. एक सामान्य व्यक्ती दिवसातून पाच ते पंधरा वेळा गॅस सोडतो. प्रत्येकवेळी याचा आवाज आणि टेम्परेचर वेगळं असतं. गॅसचं तापमान काय आहे हे फार महत्वाचं आहे आणि प्रत्येकाने यावर लक्ष दिलं पाहिजे.
गॅस का असतो गरम
त्यांनी सांगितलं की, मनुष्याच्या बॉडीचं टेम्परेचरच सोडल्या जाणाऱ्या गॅसच्या तापमानाला रेगुलेट करतं. मनुष्याच्या बॉडीचं तापमान काय आहे त्याच आधारावर गॅसचं तापमान ठरतं. हे पूर्णपणे नॉर्मल आहे. पण चिंता तेव्हा केली पाहिजे जेव्हा गॅस सोडताना जळजळ होत असेल. हा चिंतेचा विषय असू शकतो.
असं झालं तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र, अनेकदा मसालेदार पदार्थ खाल्ल्यानेही गॅस सोडताना जळजळ होऊ शकते. तेव्हा याला नॉर्मल मानलं जातं. प्रोफेसर लिसा यांनी सांगितलं की, मनुष्याच्या तोंडाचे आणि रेक्टमचे टिश्यू जवळपास एकसारखे असतात. त्यामुळे जर एखादा पदार्थ तोंडात तिखट लागत असेल तर त्याने रेक्टममध्येही जळजळ होते. अशात तिखट पदार्थ टाळले पाहिजे.