अलिकडे कमी वयात अनेकांना हाय ब्लडप्रेशर आणि इतर हृदय रोगांचा सामना करावा लागत आहे. पण याची कारणे शोधून यावर वेळीच उपाय केला तर मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. याच्या मुख्य कारणांचा विचार करता असे दिसते की, तरुणाईला फास्ट फूड फार आवडतं आणि हे आवडण्याच्या नादात ते हे विसरले आहेत की, काही काळाने याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशात तरुणांनी हे लक्षात घ्यायला हवे की, सतत जंक फूड खाल्याने वजन वाढतं आणि हृदयासंबंधी वेगवेगळे आजारही होऊ शकतात. एका शोधानुसार वाढलेलं वजन हे हृदय रोगांचं एक प्रमुख कारण आहे.
ट्रान्स फॅट्सचे दुष्परिणाम
१) बाजारात उपलब्ध असलेल्या जंक फूड्समध्ये प्रमाणापेक्षा जास्त ट्रान्स फॅट्सचा चिकटपणा असतो. हे चिकट पदार्थ हृदयाच्या नसांना ब्लॉक करतात. हे पदार्थ वाढत्या वयासोबतच नसांमधील रक्तप्रवाहाला बाधित करतात. अशा स्थितीत कालांतराने हृदय रोग होऊ शकतो.
२) शारीरिक श्रम न करणे हे सुद्धा हृदय रोग होण्याचं एक कारण आहे. तरुण-तरुणी शारीरिक करण्यास आता टाळाटाळ करतात. १०० ते २०० मीटर चालायचे असल्यासही ते वाहनाचा वापर करतात. खेळणे, व्यायाम करणे हेही आता कमी झाले आहे.
३) तरुणवर्ग आजकाल जास्तीत जास्त वेळ कम्प्युटर आणि स्मार्ट फोनवर घालवत आहेत. या कारणाने वजन वाढण्यासोबतच जीवनशैली संबंधी समस्या(डायबिटीज, हाय ब्लडप्रेशर इत्यादी) वाढत आहेत.
वाढतं वजन
आजकाल तरुणवर्ग हा आपल्या करिअरबाबत फारच तणावग्रस्त आहेत. तरुणांना सहजासहजी नोकरी मिळत नाही. नोकरी मिळाल्यावर ती टिकवण्याची स्पर्धा सुरु होते. या स्थितीमुळे तरुण तणावात आहेत. हे हृदय रोगाचं एक प्रमुख आहे.
काय करावे उपाय
हृदयासंबंधी रोगांपासून वाचण्यासाठी खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयींवर लक्ष देण्याची गरज आहे. जसे आहारात दूध आणि दुधाचे पदार्थ, फळे, भाज्या आणि धान्य सामिल करा. नियमीत व्यायाम करा. तणावाला सकारात्मक विचारांनी नियंत्रित करा.