शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

ब्रेन स्ट्रोकमध्ये ‘गोल्डन अवर’ का महत्त्वाचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 8:38 AM

हृदयाला रक्ताचा पुरवठा कमी झाल्यानंतर हृदयविकाराचा धक्का बसतो, त्याच पद्धतीने मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यावर ब्रेन स्ट्रोक येतो.

- डॉ. अविनाश गुट्टे,  इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्टनेकवेळा घरातील एखाद्या सदस्याला पक्षाघात (ब्रेन स्ट्रोक) आला की, घरातील सदस्यांची धावपळ सुरू होते. त्यांना नेमकं काय करावे कळत नाही, कोणत्या डॉक्टरकडे जावे कळत नाही. कुणी जवळच्या डॉक्टरकडे नेतात, कुणी तत्काळ घरीच काही घरगुती उपचार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा वेळी नेमकं काय करावे हे कळणे गरजेचे आहे. नातेवाइकांनी रुग्णाला ‘गोल्डन अवर’मध्ये (६ ते ८ तास) रुग्णालयात भरती करणे अपेक्षित आहे. हृदयरोगानंतर ब्रेन स्ट्रोक हे भारतातील मृत्यूचे दुसरे सर्वात सामान्य कारण आहे.

हृदयाला रक्ताचा पुरवठा कमी झाल्यानंतर हृदयविकाराचा धक्का बसतो, त्याच पद्धतीने मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यावर ब्रेन स्ट्रोक येतो. मेंदूद्वारे सर्व अवयवांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवले जाते. जर मेंदूच्या एखाद्या रक्तवाहिनीत अडथळा आला तर त्या संबंधित अवयवाच्या कार्यात बाधा निर्माण होते. मग त्यामध्ये काही वेळा तोंड वाकडे होते. अर्धे शरीर पंगू होते. रुग्णाला दीर्घकालीन अपंगत्व, बोलताना आणि गिळताना त्रास होतो. काही वेळेला उपचार वेळेत मिळाले नाही तर मृत्यूसुद्धा ओढवतो. 

ब्रेन स्ट्रोकच्या पहिल्या प्रकारात मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. तर दुसऱ्या प्रकारात मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांत रक्ताची गुठळी तयार होऊन रक्तपुरवठा थांबतो. त्यांनतर रुग्णांना ब्रेन स्ट्रोकची लक्षणे दिसण्यात सुरुवात होते. यामध्ये रुग्णालयात रुग्णाला आणल्यानंतर तत्काळ सीटी स्कॅनच्या चाचणीनंतर निदान करून नेमके काय झाले, हे जाणून उपचाराची दिशा ठरविण्यास मदत होते. दुसऱ्या प्रकारात आम्ही रक्ताची गुठळी ज्या रक्तवाहिनीमध्ये झाली आहे, ती काढून रक्तपुरवठा सुरळीत करतो. त्याला वैद्यकीय भाषेत ‘मॅकेनिकल डिव्हाइस थ्रोम्बएक्टॉमी’ असे म्हणतात. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे, तर रक्तस्राव झालेल्या रुग्णांमध्ये कोणते उपचार करायचे याचा निर्णय न्यूरॉलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन परिस्थिती बघून निर्णय घेतात. काही वेळेस औषधोपचार तर कधी शस्त्रक्रिया करावी लागते.

सर्वसाधारणपणे ४० वर्षानंतर स्ट्रोकचे रुग्ण दिसतात. मुंबई महापालिकेच्या आणि शासनाच्या रुग्णालयात या आजारावर चांगले उपचार होतात. फिजिओथेरपिस्ट मोलाची भूमिका बजावतात. नियमित फिजिओथेरपीने रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होते.

काय कारणे असू शकतात? उच्च रक्तदाव, मधुमेह, हृदयविकार, कोलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण, धूम्रपान, दारूचे व्यसन, आनुवंशिकता, अपुरी झोप, ताणतणाव

लाखामागे ८४२ रुग्ण शहरी भागात १ लाख लोकांमागे ८४२ लोकांना ब्रेन स्ट्रोक येतो तर ग्रामीण भागात त्याची नोंद व्यवस्थित होत नसल्याने तेथे १ लाखांत २२० लोकांना स्ट्रोक येत असल्याचे सांगण्यात येते.