शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

तरुणांचे हृदय का होतेय म्हातारे? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 8:19 AM

जगभरात हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण असले तरी तरुण वयात हृदयविकार होणे हे चिंतेच कारण झाले आहे. खरे तर हा आजार योग्य जीवनशैलीने दूर करण्यासारखा आहे.

डॉ. तनय पाडगावकर, हृदयरोग तज्ज्ञ, ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलल्या काही वर्षांत - विशेषत: कोरोनोत्तर काळात - तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. अगदी वयाच्या तिशी-चाळिशीतच अनेकजण हृदयविकाराने त्रस्त असल्याचे सध्याचे चित्र आहे. ही परिस्थिती का उद्भवली, याचा परामर्श घेणे आजच्या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने समयोचित ठरेल. हृदयविकाराच्या पाच रुग्णांमध्ये एकजण चाळिशीच्या आतला असल्याचे सिद्ध झाले आहे. साधारणत: साठीनंतर उद्भवणारे हृदयविकार आता १८ ते ३० वयोगटातील तरुणांना जडत आहेत. त्यामुळे कार्डिओलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) या हृदयरोगतज्ज्ञांच्या संस्थेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार आता हृदयविकाराशी संबंधित असलेली लिपिड प्रोफाइल चाचणी १८व्या वर्षी केली जावी, असे सुचविण्यात आले आहे. 

जगभरात हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण असले तरी तरुण वयात हृदयविकार होणे हे चिंतेच कारण झाले आहे. खरे तर हा आजार योग्य जीवनशैलीने दूर करण्यासारखा आहे. मात्र, अनेक तरुण आधुनिक जीवनशैलीच्या आहारी गेल्यामुळे कमी वयातच डायबिटीस, हायपरटेन्शनचे रुग्ण झाले आहेत. बॉलिवूडमधील काही मोजक्या तरुण कलाकारांनी अलीकडेच घेतलेली अकाली एक्झिट हे त्याचे ताजे उदाहरण आहे. 

कामाचा अतिताण आणि अतिचिंता, स्पर्धात्मक जगात कायम पुढे राहण्याची धडपड या सगळ्या गोष्टींमुळे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी उगाचच मोठे सल्ले देण्याची गरज नाही. कारण साध्यासोप्या जीवनशैलीने तुम्ही हृदयविकाराला तुमच्यापासून दूर ठेवू शकता. पुरेशी  झोप, वेळेवर जेवण- त्यातही साधा आहार- सकाळ किंवा संध्याकाळचा व्यायाम, योग या गोष्टी नित्यनेमाने केल्या तरी हृदयविकार तुमच्या आसपासही भटकणार नाही. वैद्यकीय साहित्यात हृदयविकार आणि सहव्याधी यावर विविध शोधनिबंधांद्वारे अनेक आकडे मांडले गेले आहेत. त्याचा अधिक विचार न करता आपली जीवनशैली चांगली कशी ठेवता येईल, याचा विचार केला पाहिजे. आपल्याकडे आजही डिस्प्लेडिया या आजाराचे प्रमाण तरुणांमध्ये अधिक आहे. पूर्वी ४० ते ४५ वयोगटामध्ये ही चाचणी केली जायची. मात्र तरुणांमध्ये दिसणारा आजार पाहून ही चाचणी वयाच्या १८ वर्षांनंतर करावी, असे सूचित करण्यात आले आहे. 

लिपिड म्हणजे काय? रक्तात कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लेसिराइड्स फॅटशी संबंधित घट म्हणजे लिपिड. लिपिडमध्ये वाढ होणे म्हणजे रक्तात या घटकांमध्ये वाढ होणे तसेच चांगले कोलेस्टेरॉल कमी होणे. अनेकदा हे हृदयविकारांना कारणीभूत ठरते. यावर जीवनशैलीत योग्य बदल करून मात करता येऊ शकते.लक्षणे काय?पायाला सूज येणे, छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मान आणि पाठ दुखणे, झोप न येणे, थकवा जाणवणे, अपचन, चक्कर येणे, घाबरल्यासारखे होणे, ही डिस्प्लेडियाची लक्षणे आहेत. 

हृदयविकाराला कारणीभूत...व्यसनाधीनता, लठ्ठपणा, मधुमेह, अतिरिक्त तेलकट, तुपकट खाणे, अतिरिक्त प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे, यकृताचे आजार, जंक फूड, आधुनिक जीवनशैली.

हार्ट अटॅक येतो म्हणजे काय? हार्ट अटॅक येणाऱ्या व्यक्तीची छाती भरून येणे किंवा अधिक प्रमाणात दाब जाणवतो. त्यासोबत छातीच्या मध्यभागी वेदना होऊन त्यासोबत मान, खांदा, पाठ हातामध्ये वेदना होतात. तसेच या व्यक्तींना श्वास घेण्यास मोठा अडथळा निर्माण होतो. काही वेळा अचानक चक्कर येऊन पडणे (सिंकोप)  यासारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे.

टॅग्स :Heart Diseaseहृदयरोग