Coffee Side Effect : जास्तीत जास्त लोक आपल्या दिवसाची सुरूवात गरमागरम कॉफीने करतात. अनेकांना कॉफी प्यायल्यानंतर एनर्जेटिक आणि फ्रेश वाटतं. कॉफीमध्ये कॅफीन असतं जे रक्तात मिक्स होऊन मेंदुचा थकवा दूर करून त्याला अॅक्टिव बनवतं. डॉक्टर मायकल मोस्ले हे सांगतात की, सकाळी उठून जे लोक कॉफी पितात त्यांनी असं करणं बंद केलं पाहिजे. कारण जेव्हा सकाळी उठून तुम्ही कॉफीचं सेवन करता तेव्हा याने ब्लड शुगर वाढते आणि ब्लड शुगर वाढली तर अनेक समस्या होतात. ज्यात डायबिटीसचाही समावेश आहे.
डॉ. मोस्ले यांच्यानुसार, 'झोपेतून उठण्याआधी तुमचं शरीर तुम्हाला दिवसभरासाठी तयार करण्यास कोर्टिसोल म्हणजे तणावाचं हार्मोन रिलीज करतं. जर यावेळी कॉफीचं सेवन कराल तर तुमचं कोर्टिसोल लेव्हल आधीच वाढलं आहे, त्यामुळे तुमच्या ब्लड शुगरला किक मिळते. पण हेही लक्षात ठेवा की, याचा धोका विना दुधाची कॉफी पिणाऱ्या लोकांनाही होतो. कारण जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमची ब्लड शुगर आधीच वाढलेली असते आणि जर सकाळी कुणी कॅफीन पितं तेव्हा त्यांची ब्लड शुगर लेव्हल आणखी वाढते.
डॉ. मोस्ले यांनी सल्ला दिला की, 'सकाळी झोपेतून उठल्यावर कमीत कमी एक तास तरी कॉफीचं सेवन करू नये. याने कोर्टिसोल हार्मोनची लेव्हल कमी होणं सुरू होईल आणि याद्वारेच ब्लड शुगरही कंट्रोल केली जाऊ शकते. मला असंही आढळलं की, जेवण केल्यावर लगेच चालल्याने ब्लड शुगर कमी करण्यास बरीच मदत मिळते. कारण चालण्याने मसल्स एक्ट्रा शुगरचा उपयोग करतात. ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं अनेकांसाठी महत्वाचं आहे कारण याने धमण्यांना नुकसान पोहोचू शकतं'.
भारत डायबिटीसची राजधानी
भारतात दिवसेंदिवस डायबिटीसच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. भारतात 10 कोटी लो डायबिटीस, 13 कोटी 60 लाख रूपये प्री-डायबिटीस आणि 31.5 कोटी लोक हाय ब्लड प्रेशरने पीडित आहेत. पण फार कमी लोकांना हे माहीत असतं की, ते या आजाराने ग्रस्त आहेत.
डॉ. मोस्ले म्हणाले की, 'यूकेमध्ये अंदाजे सात मिलियन लोक प्री-डायबेटिक आहेत म्हणजे त्यांची शुगर वाढलेली आहे. त्यांना टाइप 2 डायबिटीसचा धोका आहे. भलेही तुम्हाला माहीत नसेल, पण टाइप 2 डायबिटीसच्या आधी केवळ प्री-डायबिटीस झाल्यानेही तुम्हाला अवेळी मृत्यूचा 60 टक्के धोका असतो.