काही अपवाद वगळता काहींना कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन रडू येतं. पण काही असेही असतात ज्यांना विनाकारण रडू येतं. सिनेमातील एखादा इमोशनल सीन पाहून किंवा एखादा मित्र नाराज झाल्यावर काही लोकांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं.
कधी-कधी काही लोक हे विनाकारण रडायला लागतात. तज्ज्ञांनुसार, विनाकारण रडणे एक चिंतेची बाब आहे. यावरुन व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रुपाने आजारी असल्याचे दिसते. पण काय कधी तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, लोक का रडतात? चला जाणून घेऊ....
कधी कधी काही लोकांना दिवसभराच्या थकव्यानंतर रडू येतं. युनिर्व्हसिटी ऑफ पेनसेल्वेनियाच्या एका रिपोर्टनुसार, रोज रात्री केवळ 4 तास झोप घेतल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. झोप कमी झाल्यामुळे काही लोकांचा मूड बदलतो तर काही लोक उदास राहतात.
तज्ज्ञांनुसार, जास्त चिंता आणि तणावामुळे लोक लवकर रडायला लागतात. अशा लोकांना स्वत:ला सांभाळण्यासाठी दुसऱ्यांची गरज असते. अनेकदा काही मुली मासिकपाळी दरम्यान होणाऱ्या वेदनांमुळेही रडतात. तर काही लोकांना व्हिटॅमिनची कमतरता असणे, स्ट्रोक, थायरॉयडची समस्या, लो ब्लड शुगर असल्यानेही काही लोकांना रडायला येतं.
प्रत्येकाच्याच जीवनात काही अशा काही घटना घडत असतात ज्यामुळे त्यांना रडायला येतं. पण काही लोकांना डिप्रेशनमुळेही रडायला येतं. कधी कधी काही लोकांना थोड्या थोड्या दिवसांनी डिप्रेशन येतं त्यामुळे त्यांचा ताण कमी होत नाही.