Coconut Water : नारळाचं पाणी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि अनेक गंभीर समस्यांचा धोका टाळण्यासाठी फार फायदेशीर ठरतं. उन्हाळ्यात लोक नारळाच्या पाण्याचं भरपूर सेवन करतात. यातून अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराला मिळतात. पण हे फायदे शरीराला तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने त्याचं सेवन कराल. नारळ पाणी पिण्याची योग्य वेळही तुम्हाला माहीत असली पाहिजे.
एक्सपर्टनुसार, नारळ पाणी पिण्याची सगळ्यात योग्य सकाळी आणि दुपारी आहे. पण जर तुम्ही नारळ पाणी रात्री पित असाल तर याने काही नुकसानही होतात. नारळ पाणी रात्री प्यायल्याने काय काय नुकसान होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच नारळ पाणी पिण्याची योग्य पद्धतही जाणून घेऊ.
जास्त लघवी लागणे
नारळ पाण्यात नॅचरल ड्यूरेटिक तत्व असतात. त्यामुळे रात्री नारळ पाण्याचं सेवन केल्याने तुम्हाला पुन्हा पुन्हा लघवीला जाण्याची समस्या होऊ शकते. याने तुमची झोपही खराब होते.
पचनासंबंधी समस्या
रात्री काही लोकांना नारळ पाण्यातील शुगर आणि इलेक्ट्रोलाइट्स पचवण्यास समस्या होऊ शकते. यामुळे पोट फुगणे, गॅस आणि पोटासंबंधी इतर समस्या होऊ शकतात. त्यामुळे रात्री नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे.
शुगर वाढू शकते
नारळ पाण्यात नॅचरल शुगर भरपूर असते. त्यामुळे रात्री नारळ पाणी प्यायल्याने काही लोकांमध्ये शुगरची लेव्हल वाढू शकते. खासकरून डायबिटीस असलेल्या लोकांनी रात्री नारळ पाणी पिऊ नये.
झोप येत नाही
नारळ पाण्यात भरपूर इलेक्ट्रोलाइट्स असतात. जे ऊर्जा वाढवतात. रात्री नारळ पाण्याचं सेवन केल्याने तुमच्यातील अॅक्टिवनेस वाढतो. ज्यामुळे झोप न येण्याची समस्या होऊ शकते.
अधिक हायड्रेशन
रात्री नारळ पाणी प्यायल्याने शरीरात अधिक हायड्रेशन होऊ शकतं. अधिक हायड्रेशनमुळे इलेक्ट्रोलाइटचं संतुलन बिघडतं. ज्यामुळे थकवा, मांसपेशींमध्ये वेदना आणि इतरही काही समस्या होऊ शकतात.
नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ
मनारळ पाणी रिकाम्या पोटी किंवा दुपारी पिणं अधिक चांगलं मानलं जातं. सकाळी रिकाम्या पोटी नारळाचं पाणी प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होते. मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते. त्याशिवाय डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. सकाळी नारळ पाणी प्याल तर हार्टबर्न, एसिडिटी आणि मॉर्निंग सिकनेस दूर होतं.
वर्कआउट करण्याआधी किंवा नंतर नारळ पाणी पिता येऊ शकतं. नारळ पाणी हे एक हायड्रेटिंग ड्रिंक आहे आणि शरीराला ऊर्जा देतं. अशात हे तुम्ही एनर्जी बूस्टिंग ड्रिंकसारखं पिऊ शकता.
दुपारच्या वेळ नारळ पाणी प्याल तर याने पचन क्रिया चांगली होते. याने डायजेशनसंबंधी वेगवेगळ्या समस्याही दूर होतात. जेवण केल्यावर पोट फुगण्याची समस्याही होत नाही. नारळ पाण्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होतात ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं.