Summer Body Heat : मे आणि जून महिन्यात उष्णतेचा पारा आणखी जास्त वाढतो. नुकतीच मे महिन्याला सुरूवात झाली आहे. सकाळपासूनच सूर्य अशी आग ओकतोय की, घराबाहेर पडणंही अवघड होतं. घरातही गरमीने लोक हैराण झाले आहेत. या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही होतात. ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, त्वचा आणि डोळ्यासंबंधी समस्यांचाही धोका वाढतो. अशात लोकांना आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडण्यासही मनाई केली जाते. पण काही लोक असेही असतात ज्यांना इतरांपेक्षा जास्त गरम होतं. पण यामागचं कारण त्यांना माहीत नसतं. आज आपण हेच जाणून घेणार आहोत की, काही लोकांना इतरांपेक्षा गरम का होतं किंवा त्यांना जास्त का उकडतं?
शरीराचं तापमान
सामान्यपणे एका निरोगी व्यक्तीच्या शरीराचं तापमान साधारण 98.6°F किंवा 37°C असायला हवं. पण हेही खरं आहे की, शरीराचं तापमान व्यक्तीचं वय, त्याच्या राहण्याचं ठिकाण आणि कामावरही अवलंबून असतं. आपलं शरीर स्वत: शरीराचं वाढतं आणि कमी होणारं तापमान कंट्रोल करतं. तेच काही स्थिती अशा असतात ज्यात शरीराला जास्त गरम वाटू लागतं. अशात तुम्हाला इतरांच्या तुलनेत जास्त गरम वाटतं.
वैज्ञानिक सांगतात की, आपल्या शरीरात रक्त सर्कुलेट करणारी प्रणाली तापमानाला कंट्रोल करण्याचं काम करते. जेव्हा आपल्या रक्तनलिका पसरतात तेव्हा ब्लड फ्लो जास्त होऊ लागतो. रक्त सर्कुलेट होण्याचा स्पीडही वाढतो. तेव्हा याने शरीरात जास्त ऊर्जा उत्पन्न होते. अशात तुम्हाला जास्त गरम वाटू शकतं. तेच जर रक्तनलिका जर आकुंचन पावल्या तर रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. अशावेळीही गरम वाटू लागतं.
एक्सपर्ट्स सांगता की, जेव्हा आपण खूप चिंतेत किंवा तणावात असतो तेव्हा ऑटोनोमिक नर्वस सिस्टम अॅक्टिव होतं. अशा स्थितीत शरीराच्या मुख्य अवयवांमध्ये रक्त पुरवठा वेगाने होऊ लागतो. अशावेळीही तुम्हाला जास्त गरम होऊ लागतं. सोबतच जेव्हा तुम्ही जास्त मसालेदार-तेलकट गोष्टींचं सेवन करता तेव्हाही हृदयाची गती वाढते. ज्यामुळे तुम्हाला जास्त गरम होतं आणि घाम येऊ लागतो. तसेच धूम्रपान, जास्त दारू पिणे, तेलाचे पदार्थ खाणे यामुळेही तुम्हाला जास्त गरम होतं.
काही आजारही असतात कारण
काही रिसर्चमधून याचा खुलासा झाला आहे की, महिलांच्या शरीराचं तापमान पुरूषांच्या शरीराच्या तापमानापेक्षा जास्त असतं. तसेच ज्या व्यक्तींच्या शरीरात फॅटचं प्रमाण जास्त असतं त्यांनाही जास्त गरम होतं. इतकंच नाही तर हायपोथायरायडिज्म म्हणजे अंडरअॅक्टिव थायरॉइडने पीडित लोकांनाही जास्त गरम होत असतं. जर तुम्हाला एनीमिया, हार्टरी डिजीजसारख्या समस्या असेल तरीही तुम्हाला जास्त उकडतं.