Garlic in Pillow benefits : लसणाचा वापर आपल्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. आर्युवेदानुसार याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. आयुर्वेदात लसणाला फार महत्व आहे. कारण याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. तुम्ही जेवणात लसूण खात असालच पण आज आम्ही तुम्हाला लसणाची एक वेगळी ट्रिक सांगणार आहोत.
रोजच्या आहारात लसणाचा समावेश करण्यासोबत किंवा लसूण जेवताना कच्चा खाण्यासोबतच दररोज रात्री झोपताना उशीखाली लसणाची एक पाकळी ठेवली तर तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. हे फार लोकांना माहीत नसतं. याचा नेमका काय फायदा हे जाणून घेऊ.
पूर्वीच्याकाळी लसूण घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवला जायचा. यामुळे घरातील हवेमध्ये असलेले रोगजंतू नाहीसे व्हायचे. त्याचसोबत लसूण नकारात्मक उर्जा खेचून घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करतो. यामुळे अनेक लोक लसणाची पाकळी (Garlic Cloves Benefits) आपल्या उशाखाली घेऊन झोपतात. उशीखाली लसणाची पाकळी उशीखाली ठेऊन झोपल्याने शांत झोप लागते.
आजकाल लाइफस्टाईल खूपच धावपळीची आणि व्यस्त झाली आहे. आपण सतत शरीराने असो किंवा मेंदूने कुठेतरी गुंतलेले असतो. अशा परीस्थितीत आपला शरीराला आणि मेंदूला शांततेची आणि आरामाची नितांत गरज असते. मात्र अनेकदा आपल्यालों अशी शांत झोप लागत नाही. मग यासाठी आपण काही घरगुती उपाय वापरतो. अन्यथा टॅब्लेट्स घेतो. पण यासाठी एक लसणाची पाकळीही पुरेशी आहे.
कोलेस्टेरॉल कमी होतं
कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत.
रोगप्रतिकाराक शक्ती वाढते
रोगप्रतिकाराक शक्ती असते. पूर्वी लसणाचा कांदा घराच्या कोपऱ्या ठेवला जायचा. कारण हवेतील रोगजंतू नाहीसे व्हायचे. लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते.
नकारात्मक ऊर्जा दूर होते
लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.
कफ दूर होतो
लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे. तसेच पोटाच्या अनेक समस्या यामुळे दूर होतात. शरीरातील अनेक विषारी पदार्थ यामुळे बाहेर पडतात.
गॅस होत नाही
पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करते. हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून उपकारक कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.
ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं
लसणामधील पोटॅशिअम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते व त्या योगे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाची स्पंदनेही नियंत्रित ठेवण्यास या पोटॅशियमचा उपयोग होतो.
लसण खाण्याचे फायदे
लसणात असलेले ‘क’ जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व व जस्त यांचा रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यास उपयोग होतो. लसणात अॅलिसिन नावाचे औषधी तत्त्व असते. त्यामुळे बुरशीचा संसर्ग, जीवाणू, विषाणू संसर्ग बरे होण्यास मदत होते.