(Image Credit : www.thefoodstatecompany.com)
व्हिटॅमिन-ई हे आपल्या आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे केसगळती आणि त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी व्हिटॅमिन-ई चा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन-ई शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांना देखील फायदा होतो. तसेच डायबिटीज आणि हृदयासंबंधी आजारांपासून बचाव करण्यासाठीही व्हिटॅमिन ई महत्त्वाची भूमिका बजावतं.
रक्तपेशी निर्मितीत मदत
व्हिटॅमिन-ई शरीरात रक्त वाढवणाऱ्या रक्तपेशी म्हणजेच लाल रक्तपेशींची निर्मिती करतं. जर गर्भवती स्त्रीयांनी गरोदरपणात व्हिटॅमिन ई चं सेवन केलं नाही तर त्यांच्या बाळाला एनीमिया किंवा रक्ताची कमतरता असणे या समस्या होऊ शकतात.
अॅंटी-ऑक्सिडेंटचं काम करतं व्हिटॅमिन-ई
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचा विषय असो, शरीराचा अॅलर्जीपासून बचाव करण्याचा विषय असो किंवा कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचा विषय असो यासाठी व्हिटॅमिन ई फार गरजेच असतं. व्हिटॅमिन ई हे असं व्हिटॅमिन आहे जे संपूर्ण आरोग्यासंबंधी उपयोगी असतं. हे एका अॅंटी-ऑक्सिडेंटप्रमाणे काम करतं. पण जर शरीरात व्हिटॅमिन ई कमी असेल तर वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.
डायबिटीजमध्ये फायदेशीर
डायबिटीज असलेल्या रुग्णांनी व्हिटॅमिन-ई सेवन करायला हवं. कारण याने शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढतं. इन्सुलिनमुळे रक्तातील शुगरचं प्रमाण कमी केलं जातं. त्यासोबतच डायबिटीजच्या रुग्णांना हृदयरोगांचाही धोका असतो. एका शोधानुसार, ४० टक्के डायबिटीजच्या रुग्णांना सामान्य लोकांपेक्षा हृदय रोगांचा धोका ३ टक्क्यांनी अधिक असतो. हा धोका कमी करण्याचं काम व्हिटॅमिन ई मुळे कमी करता येऊ शकतो. अशा लोकांनी दिवसातून ४०० आईयू व्हिटॅमिन-ई घेतलं पाहिजे. याने त्यांना अधिक फायदा होतो, असे सांगितले जाते.
व्हिटॅमिन-ई चे फायदे
१) शरीरातील फॅटी अॅसिडला नियंत्रित करण्याचं काम व्हिटॅमिन-ई करतं.
२) गर्भावस्थेत व्हिटॅमिन ई घेतल्याने नवजात बाळाला एनीमिया होण्याचा धोका कमी होतो.
३) रक्तपेशी तयार करण्यासाठी व्हिटॅमिन ई महत्त्वाची भूमिका बजावतं.
४) त्वचा मुलायम, सुंदर करण्यासाठी आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी व्हिटॅमिन ई फायदेशीर आहे.
५) शरीरातील अंग सामान्य ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ई ची मदत होते.
६) हार्मोन्स नियंत्रित ठेवण्यासाठी व्हिटॅमिन-ई महत्त्वपूर्ण योगदान देतं.
७) व्हिटॅमिन-ई मुळे संसर्गजन्य रोगांपासून बचाव होतो.
कशातून मिळतं व्हिटॅमिन-ई
अंडी, सुखा मेवा, बदाम, अक्रोट, सूर्याफूलाच्या बिया, हिरव्या भाज्या, रताळी, मोहरी, एवोकेडो, ब्रोकली, आंबे, पपई, भोपळा, पॉपकॉर्न यातून व्हिटॅमिन-ई भरपूर प्रमाणात मिळतं. तसेच गहू, चणे, जव, खजूर, तांदूळ, क्रीम, लोणी, आणि फळांमधूनही व्हिटॅमिन-ई भरपूर मिळतं.
सांगायचं हेच की अलिकडे चांगला परिपूर्ण आहार मिळणे कठिण झालं आहे. अशावेळी जर आहाराबाबत आपण जागरूक राहिलो तर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. वातावरणातील बदल यामुळे इतकं काही बदललं आहे की, आपण फिट दिसत असलो तरी आतून फिट नसतो. त्यामुळे अशाप्रकारचे शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन्स घेण्याकडे आपल्या बिझी शेड्युलमधून लक्ष दिलं पाहिजे.