अनेक अशा महिलांना तुम्ही पाहिलं असेल ज्या नेहमी वर्कआउट करून किंवा डाएट करूनही त्यांचं वजन कमी करण्यात यशस्वी होत नाहीत. याचं नेमकं काय कारण असेल याचा विचार करून त्या थकलेल्या असतात. पण मुळात शरीराच्या मेटाबॉलिज्मसोबतच काही खास प्रकारचे हार्मोन्सही असतात, जे तुमचं वजन नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. चला जाणून घेऊ त्या हार्मोन्सबाबत आणि ते कसे वजन नियंत्रित करतात.
आयुष्यरभर बदल होत असतात
महिलांच्या शरीरात असे काही हार्मोन्स असतात जे त्यांच्या वयानुसार आणि स्थितीनुसार त्याचं काम बदलत राहतात. जसे की, गर्भधारणा आणि मेनोपॉजवेळी. या प्रक्रियांमध्ये आयुष्यभर चढउतार येत राहतात. त्यामुळे महिलांसाठी वजन कमी करणे पुरूषांच्या तुलनेत जास्त आव्हानात्मक असतं. महिलांच्या त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हार्मोनल असंतुलन, योग्य आहार न घेतल्याने येणारी कमजोरी आणि हळू पचनक्रियेचा सामना करावा लागतो.
टेस्टोस्टेरॉन
(Image Credit : Slimpify)
काही महिला या पॉलिसिस्टीक ओवरियन सिंड्रोम (पीसीओएस) नावाच्या हार्मोनल विकाराने ग्रस्त असतात. याने टेस्टोस्टेरॉनचा स्तर वाढतो, ज्यामुळे मासिक पाळीसंबंधी समस्या, चेहऱ्यावर केस येणे, पिंपल्स आणि इनफर्टिलिटी वाढते. टेस्टोस्टेरॉन महिलांमध्ये मसल्स माससाठी जबाबदार असते. मेनोपॉज दरम्यान टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी झाल्या कारणाने, पचनक्रियेत समस्या आल्याने वजन वाढतं.
कोर्टिसॉल
वजन वाढण्यासाठी स्ट्रेस हार्मोन कोर्टिसॉल मुख्यत्वे जबाबदार आहे. कोर्टिसॉलचं प्रमाण अधिक झालं तर भूक वाढते आणि जास्त खाल्ल्यामुळे अर्थातच वजन वाढू लागतं. तणाव आणि झोपेची कमतरता या दोन कारणांमुळे कोर्टिसॉलचं प्रमाण रक्तात अधिक वाढतं. कुशिंग सिंड्रोम एक अतिसंवेदनशिल स्थिती आहे, जी कोर्टिसॉलच्या उत्पादनाला हॅंडल करते.
थायरॉइड हार्मोन्स
थायरॉइड हार्मोनची कमतरता खासकरून महिलांमध्ये आढळते. हायपोथायराडिज्म महिलांमध्ये वजन वाढण्यासाठी जबाबदार असतो. याच्या सामान्य लक्षणांमध्ये थकवा, वजन वाढणं, ड्राय त्वचा आणि पोटदुखी ही आहेत. वजन वाढणं शरीरात पचनक्रियेचा दरही कमी झाल्यानेही होतं.
एस्ट्रोजेन
(Image Credit : Everyday Health)
एस्ट्रोजेन महिला सेक्स हार्मोन आहे. मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती दरम्यान, एस्ट्रोजनचं प्रमाण कमी होऊ आतड्यांच्या आजूबाजूचं वजन वाढू लागतं. अशात कॅलरी चरबीमध्ये बदलतात आणि वजन वाढू लागतं.
प्रोजेस्टेरॉन
(Image Credit : lifetimestyles.com)
रजोनिवृत्तीदरम्यान शरीरात प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं. पण हे हार्मोन कमी झाल्याने वजन वाढत नाही. मात्र, वॉटर रिटेंशन आणि ब्लॉटिंगमुळे असं होतं. याने महिलांचं शरीर फुगलेलं आणि भारी वाटतं.
इन्सुलिन
हार्मोन इन्सुलिनचं निर्मिती अग्नाशयात बीटा पेशी द्वारे केली जाते. इन्सुलिन शरीरात फॅट आणि कार्बोहायड्रेटच्या नियंत्रणासाठी जबाबदार आहे. इन्सुलिन शरीराला ग्लूकोजचा वापर करण्याची अनुमती देतं. इन्सुलिन सुद्धा पीसीओएससाठी इनफर्टिलिटीकडे नेणारं एक कारण आहे. तसेच रक्तात इन्सुलिनचं प्रमाण वाढल्यास वजन वाढू लागतं.