शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

आज 'जागतिक रेडिओग्राफी दिवस' का साजरा केला जातो ? एक्स रे चा शोध कसा लागला जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 10:03 AM

रेडिओग्राफी क्षेत्राविषयी जागरुकता निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी ८ नोव्हेंबर ला जागतिक रेडिओग्राफी दिवस साजरा केला जातो.  रेडिओग्राफी चा शोध कसा लागला ?

रेडिओग्राफी म्हणलं की आठवतं ते म्हणजे एक्स रे. शरिरातील अवयवांमध्ये होत असणाऱ्या त्रासाचे नेमके निदान करण्यासाठी एक्स रे मशीन वापरली जाते. आता तंत्रज्ञान आणखीनच विकसित झाले आहे. सीआर, एमआरआय, एंजिओग्राफी यासारख्या तंत्राचा वापर होत आहे. यामुळे रुग्णांनाही आजाराची इत्थंभूत माहिती मिळते. रेडिओग्राफी क्षेत्राविषयी जागरुकता निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी ८ नोव्हेंबर ला जागतिक रेडिओग्राफी दिवस साजरा केला जातो.  

रेडिओग्राफी चा शोध कसा लागला ?

जागतिक रेडिओग्राफी दिवस २०१२ पासून साजरा केला जातो. ८ नोव्हेंबर १८९५ रोजी जर्मनीच्या वारबर्ग विद्यापिठाच्या फिजिक्स प्राध्यापक विल्हेम कॉलरैड रॉटंटजेन यांनी एक्स रे चा शोध लावला. तर पहिला एक्स रे त्यांनी पत्नी बर्थाच्या हाताचा काढला. सुरुवातीला एक्स रे चा वापर करणे तसे कठीण होते. रेडिओग्राफरला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र काळानुसार रेडिओग्राफीमध्ये अनेक बदल झाले. यामुळेच आज अनेक आजारांचे त्वरित विदान होते. 

रेडिओग्राफी दिवसाचे महत्व

जगभरात हा दिवस रेडिओग्राफी जागरुकता अभियान म्हणून साजरा केला जातो. याचा मूळ उद्देश लोकांना रेडिओग्राफीमुळे होणाऱ्या फायद्याची माहिती देणे हा आहे.जेणेकरुन वेळीच आजाराचे निदान होइल. आजही अनेक छोट्या छोट्या गावांमध्ये लोक रेडिओग्राफीपासून लांब राहतात. यामुळेच वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने गावातील मृत्युदर अधिक असतो. या दिवशी अनेक रेडिओग्राफी असोसिएशन आणि सोसायटी मोफत टेस्ट आणि एक्स रे चाचणी शिबिर ठेवते. हजारो लोक याचा लाभ घेतात.