(Image Credit : www.welcomekyushu.com)
स्टीम बाथ, सन बाथ, मड बाथ अशी वेगवेगळी नावे तुम्ही अनेकदा ऐकली असतील. पण कधी तुम्ही सॅन्ड बाथने मिळणाऱ्या फायद्यांबाबत ऐकलंय का? नाही ना? चला तर मग जाणून घेऊ याचे फायदे. परदेशात सॅन्ड बाथचं चलन फार पूर्वीपासून आहे. सॅन्ड बाथचा फायदा तुम्ही वाळू किंवा रेती असलेल्या स्थानांवर घेऊ शकता. जपान आणि आफ्रिक्रेसारख्या देशांमध्ये सॅन्ड बाथ हळूहळू टुरिज्मचा भाग होत आहे.
तसं पाहिलं तर परदेशात आणि आपल्या देशात प्राचीन काळापासून सॅन्ड बाथ म्हणजेच वाळूने आंघोळ करणे आपल्या सौंदर्यासाठी इतिहासाचा भाग राहिलं आहे. आयुर्वेद आणि नैसर्गिक चिकित्सेमध्ये वाळूने आंघोळ करण्याबाबत उल्लेख बघायला मिळतो. चला जाणून घेऊ याचे फायदे...
कसं केलं जातं सॅन्ड बाथ
या आगळ्या वेगळ्या आंघोळीत व्यक्तीला वाळूखाली अर्धा ते एक तासांसाठी दाबून ठेवलं जातं. याने व्यक्तीच्या शरीराला आराम तर मिळतोच, सोबतच याने शरीरातून टॉक्सिन बाहेर निघतात. वाळूमध्ये भरपूर प्रमाणात क्षार असतात, त्यामुळे याने शरीरातील क्षार शोषूण खनिज प्रक्रियेद्वारे शरीराला आराम मिळतो.
ज्या लोकांना त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या असतात त्यांच्यासाठी सॅन्ड बाथ फायदेशीर आहे. खाज, खरुज, सूज, पांढरे डाग, जखमांचे डाग सॅन्ड बाथने दूर होण्यास मदत मिळते. ज्यांना शरीरार नेहमी नेहमी पुरळ येतात त्यांनाही याने फायदा मिळू शकतो.
पोटाची समस्या होते दूर
पोटदुखी किंवा पोटाची समस्या असणे ही वेगवेगळ्या आजारांचं मूळ कारण आहे. त्यामुळे पोटावर गरम वाळूची पट्टी ठेवल्याने तुम्हाला फायदा मिळू शकतो. याने पोटातील उष्णता शोषूण घेतली जाते आणि पोटाला आराम मिळतो.
जखमांचे डाग करा दूर
अपघात किंवा पडल्याने शरीरावर वेगवेगळे डाग पडतात. हे डाग सॅन्ड बाथच्या मदतीने दूर केले जाऊ शकतात. आयुर्वेदानुसार, कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी माती इतर उपायांपेक्षा जास्त प्रभावी ठरते. याने लगेच फायदा बघायला मिळतो. अशावेळी जखमेचा डाग असणाऱ्या जागेवर नेहमी मातीचा लेप किंवा पट्टी लावायला हवी.
रक्तप्रवाह
सॅन्ड म्हणजेच वाळू ही गरम असते. याच्या गरम असल्यामुळे शरीराचं तापमान एकाएकी वाढतं. ज्यामुळे हार्टबीट वाढण्यासोबतच रक्तप्रवाह सुद्धा वाढतो. याने शरीरात ऑक्सिजनचा स्तरही नियंत्रित राहतो. याचा प्रभाव शरीरावर जास्त काळासाठी बघायला मिळतो.
वेगवेगळ्या आयुर्वेदिक उपचारांचा आता अनेक लोक वापर करु लागले आहेत. पण भारतात अजूनही सॅन्ड बाथ तेवढी प्रचलित नाहीये. पण जपान आणि आफ्रिकेमध्ये याचं चलन वाढत आहे. मात्र भारतात शरीराला माती लावून अनेक उपचार केले जातात आणि त्यांचा काही लोकांना फायदा झालेलाही बघायला मिळतो.