बरेच पुरूष पैसे, एटीएम, केड्रिट कार्ड, महत्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी पॅंटच्या खिशात पाकीट ठेवतात. सामान्यपणे पॅंटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवलं जातं. पण असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. पॅंटी मागच्या खिशात पाकीट ठेवण्याने काय होतं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जास्तीत जास्त पुरूष पैसे किंवा इतर गोष्टी ठेवण्यासाठी जीन्सच्या मागच्या खिशात पाकीट ठेवतात. कधी कधी पाकीट खूप जास्त जाड असतं. कारण त्यात जास्त गोष्टी ठेवलेल्या असतात. ज्यामुळे बसतानाही समस्या होते. पण तरीही लोक मागच्या खिशात पाकीट ठेवतात.
अनेक एक्सपर्ट सांगतात की, पाकीट मागच्या खिशात ठेवणं फार नुकसानकारक ठरू शकतं. यामुळे वेगवेगळ्या गंभीर समस्या होतात. इतकंच नाही तर चोरी होण्याचा धोकाही जास्त असतो. पाकीट असं मागच्या खिशात ठेवल्याने शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर प्रभाव पडतो.
काय होतं नुकसान
एका रिपोर्टनुसार, ज्यांना मागच्या खिशात पाकीट ठेवण्याची सवय आहे ती त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे. ही सवय वेळीच बदलली पाहिजे. कारण ही सवय तुमची बसण्याची पद्धत आणि पाठीसाठी घातक ठरते. डॉक्टरनुसार, मागच्या खिशात पाकीट ठेवल्याने बसताना एक असंतुलन निर्माण होतं, जे हिप्स आणि पेलिवससाठी घातक ठरतं. पेलविस एक बेसिन शेपचं स्ट्रक्चर असतं जे शरीरात स्पायनल कॉलम आणि पोटाला सपोर्ट देतं.
त्याशिवाय मागच्या खिशात पाकीट ठेवल्याने वेदना, डिजनरेशन आणि सायटिकासारख्या समस्या होतात. जास्त काळ असं केल्याने जॉइंट्समध्ये वेदनाही होतात.
या समस्या मागच्या खिशात जाड किंवा मोठं पाकीट ठेवल्यानेच नाही तर लहान पाकीटानेही सायटिकाच्या वेदनेची समस्या होते. एका रिपोर्टनुसार, जर एखादी व्यक्ती मागच्या खिशात पाकीट ठेवत असेल आणि त्यावर बसून अर्धा तास गाडी चालवत असेल तर याने पाठदुखी आणि सायटिक वेदनेची समस्या होते. अशात पाकीट बॅगेत ठेवा.