जास्तीत जास्त लोक मॉर्निंग वॉक करताना मोबाइल फोनचा वापर करतात. पण तुम्ही कधी विचार केला का की, याने तुम्हाला किती नुकसान होतं? काही लोक मॉर्निंग वॉक करताना गाणी ऐकतात. तर काही लोक हेडफोन लावून फोनवर बोलता बोलता वॉक करतात. इतकंच काय तर हेडफोन लावून वॉक करणं हा एक स्टेटस सिंबल झाला आहे. एक्सपर्टनुसार, ही सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते.
बॉडी पोश्चर खराब होणं
फोनचा वापर बॉडी पोश्चरवरही प्रभाव टाकतो. एक्सपर्ट्सनुसार, चालताना स्पाइनल कॉर्ड म्हणजे पाठीचा कणा नेहमी सरळ रहायला हवा. जेव्हा तुम्ही मोबाइलचा वापर करता तेव्हा सगळं लक्ष फोनवर राहतं. स्पाइनल कॉर्ड सरळ राहत नाही. जर तुम्ही जास्त वेळ वॉक करत असाल आणि फोन वापरत असाल तर तुमचं बॉडी पोश्चर खराब होऊ शकतं. (हे पण वाचा : कोणत्या वेळी आंघोळ केल्याने होतात जास्त फायदे आणि कोणत्या वेळी आंघोळ करू नये?)
मांसपेशींमध्ये वेदना
वॉक करताना तुमची संपूर्ण बॉडी अॅक्टिव राहते आणि पूर्ण शरीराची एक्सरसाइज होते. पण जर तुम्ही चालत असताना एका हातात फोन धरून राहत असाल तर याने मांसपेशींमध्ये असंतुलन निर्माण होतं. यामुळे तुमच्या मांसपेशींमध्ये वेदना होऊ शकते.
एकाग्रतेत कमतरता
जेव्हा तुम्ही मोबाइल फोनचा वापर मॉर्निंक वॉक दरम्यान करता, तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष चालण्याकडे नसतं. श्वासावर नसतं. याने तुमचं नुकसान होऊ शकतं. अशाप्रकारे चालण्याने तुम्हाला पूर्ण फायदा मिळणार नाही.
पाठदुखी
बराच काळ तुम्ही मॉर्निंग वॉक करताना ही सवय कायम ठेवणार असाल तर याने तुम्हाला पाठदुखीची समस्या होऊ शकते. त्यामुळे हे ध्यानात ठेवा की, चालताना मोबाइल फोनचा वापर अजिबात करू नका.