हिवाळ्यातील उत्तम ड्रायफ्रूट-खजूर !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2016 5:25 PM
हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी विविध प्रकारचे ड्रायफ्रूट घ्यायला हवेच. त्यापैकी खजूर घेतले तर अधिक उत्तम. कारण खजुरामध्ये आयर्न, पोटॅशिअम, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, झिंक,फॉस्फरस असे शरीराला आवश्यक घटक आढळतात. तसे अतिशय चविष्ट असणारे खजूर सर्वांनाच आवडतात.
हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी विविध प्रकारचे ड्रायफ्रूट घ्यायला हवेच. त्यापैकी खजूर घेतले तर अधिक उत्तम. कारण खजुरामध्ये आयर्न, पोटॅशिअम, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, झिंक,फॉस्फरस असे शरीराला आवश्यक घटक आढळतात. तसे अतिशय चविष्ट असणारे खजूर सर्वांनाच आवडतात. संपूर्ण जगात खजुराचे सेवन मोठ्या आवडीने केले जाते. विशेषत: खजुरात शरीराला त्वरित ऊर्जा पुरवण्याची क्षमता असते त्यामुळे जेव्हा आपणास निरुत्साह किंवा अशक्त वाटत असेल तेव्हा २-३ खजूर खा. लगेच आपणास फ्रेश वाटेल. अजून महत्त्वाचे म्हणजे खजुरात विविध अॅलर्जीवर गुणकारी असे आॅरगॅनिक सल्फर आढळते, जे खूप कमी खाद्यपदार्थांमध्ये आढळते. खजुरामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्याप्रमाणात असून, ऊर्जा, साखर, आणि फायबरचा एक चांगला स्रोत आहे. त्यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याने हाडांची चांगली वाढ होते. खारीक दुधामध्ये उकळून घेतल्यास भूक वाढण्यास मदत होते. शिवाय हे दूध अतिशय पौष्टिक असून अन्न व्यवस्थित पचण्यास मदतही होते.