हिवाळ्याच्या वातावरणात काही दिवसांपासून जास्त गारवा जाणवायला सुरूवात झाली आहे. जास्तीत जास्त लोक गरम वातावरण ठेवण्यासाठी हिटरचा वापर करतात. अनेकांच्या घरी रूम हिटरचासुद्धा वापर केला जातो. रूम हिटर आरोग्यासाठी नुकसानकारक ठरत असून अनेकदा हिटरचा जास्त वापर जीवघेणा ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला हिटरचा जास्त वापर केल्याने कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो याबाबत माहिती देणार आहोत.
हिटरच्या जास्त वापरामुळे हवेत आद्रतेचे प्रमाण कमी होते. हवेत आद्रतेची कमी असल्यामुळे तुम्हाला त्वचेसंबंधीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय हिटरचा जास्त वापर केल्यानं श्वासांसंबंधी समस्या उद्भवू शकता. म्हणून अस्थमाचा त्रास असलेल्यांनी हिटरचा वापर करू नये.
हिटरचा अति वापर केल्यास खोलीत ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यानंतर तुम्हाला श्वासांसंबंधी इतर त्रासांचा सामना करावा लागू शकतो. खोलीत हीटरचा वापर करत असताना एक पाण्याचे भांडेसुद्धा भरून ठेवा. यामुळे हवेत आद्रतेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल. याशिवाय हिटर नेहमी योग्य तापमानात सेट करा.
वर्षातून किमान दोनवेळा हिटरचे सर्विसिंग करा. सर्विसिंग केल्यानंतर हिटरची ट्यूब, कॉईल आणि बँड चांगल्या पद्धतीने काम करेल. या वस्तूंच्या खराब होण्यामुळे खोलीत कार्बन मोनोऑक्साईडचे जास्त प्रमाणात उत्सर्जन होते. त्यामुळे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. हिटरचा वापर करताना दरवाजे खिडक्या उघड्या ठेवा, दरवाजे किंवा खिडक्या उघड्या ठेवल्याने तुम्ही तुमची खोली अधिक स्वच्छ ठेवू शकता. रूम हिटरला नेहमी वयस्कर लोक आणि लहान मुलांपासून लांब ठेवा.
हिवाळ्याच्या दिवसात गरम पाणीच पीणं ठरतं फायद्याचं
गरम पाणी पिताना त्यातून जी वाफ मिळते त्यामुळे चोंडलेल्या नाकाला आराम मिळतो आणि बंद नाकाची तक्रारही दूर होते. पाणी पिताना ग्लास अशा पद्दतीने पकडा की, त्या पाण्याची वाफ आपल्या घशाच जाईल. गरम पाण्याची वाफ श्वासावाटे घशात गेल्याने सायनस आणि सायनस आजारामुळे होणारी डोकेदुखीची समस्या दूर होते.
हिवाळ्यात शिंका, सर्दीच्या समस्येने हैराण आहात; 'या' घरगुती उपायांनी सायनसची समस्या होईल दूर
गरम पाणी पोटामध्ये आणि आतड्यांमध्ये फिरते तेव्हा पचनक्रिया चांगल्या प्रकारे हायड्रेट होऊन पोटातील विनावश्यक गोष्टींचा निचरा करू शकते. दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्यायला हवं.
काळजी वाढली! समोर आलं कोरोना संक्रमणाचं नवं लक्षणं; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा
सकाळी गरम पाणी प्यायल्यास पचनक्रिया लगेचच सुरू होते आणि शरीरातील विषद्रव्य पदार्थही निघून जाण्यास मदत होते. लिंबूमध्ये विटामिन ‘सी’ असल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे सकाळी सकाळी गरम पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मध टाकून प्यायल्यास वजन नियंत्रणात आणण्यास किंवा कमी करण्यात मदत होते.