Winter Health Tips : अजून जरी थंडी जास्त पडायला सुरूवात झाली नसली तरी थंडीच्या दिवसात आरोग्याची काळजी कशी घेतली जावी याकडे लक्ष दिलं पाहिजे. तशी थंडीच्या दिवसात सर्दी-खोकल्याची समस्या होणं सामान्य बाब आहे. तसेच शरीराचं तापमान मेन्टेन करणं या दिवसात जरा अवघड जातं, शरीराचं तापमान कमी झाल्याने हृदयाला अधिक वेगाने काम करावं लागतं. अशात लोक ऑफिसमध्ये एसीत बसून काम करतात, त्यांच्यासाठी तर हिवाळा आणखीनच त्रासदायक ठरू शकतो. अशात शरीर गरम ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात, पण या उपायांनी आपलं आरोग्यही धोक्यात येऊ शकतं.
पुन्हा पुन्हा चहा-कॉफी पिण्याची सवय
सकाळी फ्रेश होण्यासाठी आणि कामाचा स्ट्रेस घालवण्यासाठी किंवा थंडी वाजत असताना थोडा आराम मिळावा म्हणून गरमा-गरम चहा-कॉफीचं सेवन अनेकजण करतात. पण ऑफिसच्या एसीच्या थंडीत स्वत:ला गरम ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा चहा किंवा कॉफीचं सेवन करू नका. याने तुम्ही अधिक प्रमाणात कॅफीन आणि साखरेचं सेवन करता. कॅफीनच्या अधिक प्रमाणामुळे तुम्हाला पोटाची समस्या, अस्वस्थता, डोकेदुखी आणि छातीत वेदना यांसारख्या समस्या होऊ शकतात.
तळलेले-भाजलेले पदार्थ खाणे
थंडीच्या दिवसात अनेकजण थंडी घालवण्यासाठी सतत काहीना काही खात किंवा पित राहतात. थंडी वाजत असेल तर अनेकजण गरमागरम आलू चाट किंवा गरमागरम भजी खातात. पण इथेच आपलं चुकतं. या दिवसात फार जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल आणि फॅटचं प्रमाण वाढतं. हे तुमच्या हृदयासाठी चांगलं ठरत नाही.