Health Tips: सर्वसाधारणपणे अक्कलदाढ वयाच्या १६ ते १८ या काळात येते. त्यावेळी तरुणाचे वय वाढलेले असते. त्यामुळे जुन्या काळी त्याला अक्कलदाढ असे म्हटले जायचे. मात्र, वास्तवात दंततज्ज्ञांच्या मते, त्या दाढांचा आणि हुशारीचा काहीही संबंध नाही. या दाढा सर्वांत शेवटी येतात.
अनेक वेळा या दातांचा त्रास झाल्यामुळे नागरिक डॉक्टरकडे जातात. त्यावेळी अक्कल दाढेमुळे त्या व्यक्ती त्रास असल्याचे जाणवत असल्याने डॉक्टर त्या दाढा काढून टाकतात. त्यामुळे अक्कल दाढेचा काही संबंध नसून त्या वयाच्या विशिष्ट एका टप्प्यावर येतात. त्या दाढा काढल्यामुळे त्याचा मौखिक आरोग्यावर काहीही परिणाम होत नाही. दाढेचा त्रास रुग्णाला होता असेल तरच काढली जाते, अन्यथा काढण्याची गरज भासत नाही.
माणसाच्या जबड्यात चार अक्कल दाढा असतात. उजव्या आणि डाव्या बाजूस वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला या दाढा येतात. त्या वयाच्या १६ ते १८ दरम्यान येतात. काही वेळा तर या दाढा येतसुद्धा नाहीत. त्या दाढा आल्या म्हणजे आपणास व्यक्तीला अक्कल येते. जर त्या दाढा काढून टाकल्या तर त्या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम होतो. बुद्धी कमी होते. त्याची हुशारी कमी होते.
अक्कल दाढेबद्दल अनेकांचे गैरसमज आहेत. त्याचा आणि हुशारीचा काही संबंध नाही. उलट या दाढा सर्वांत शेवटी असतात. त्यामुळे अनेक वेळा जबड्यात त्या दाढा यायला जागा नसते. त्या इतर दातांना त्रास देतात. काही वेळा त्या पूर्ण येत नाहीत. परदेशात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अक्कल दाढा काढल्या जातात. आपल्याकडे मात्र रुग्णांना त्रास झाला तरच आपण या दाढा काढतो. - डॉ कविता वड्डे, सहयोगी प्राध्यापक, शासकीय दंत रुग्णालय, मुंबई ओरल अँड मॅक्सिलोफेशिअल सर्जरी विभाग प्रमुख
अक्कलदाढ कधी काढावी लागते?
दंत तज्ज्ञांच्या मते अक्कल दाढ सर्वांत उशिरा येते. तोपर्यत तोंडातील इतर दात आलेले असतात.
अक्कल दाढेमुळे इतर दातांवर काही वेळ दबाव येतो. इतर दातांना त्रास होतो. त्या दाढांना यायला जागा नसते. त्याचा इतर दातांवर परिणाम होतो.
काहीवेळा वेदनासुद्धा होतात, त्यावेळी मात्र एक्स रे काढून पहिला जातो आणि मग रुग्णाला होणारा त्रास पाहून अक्कल दाढ काढली जाते.