मासिक पाळीचे ४ ते ५ दिवस प्रत्येक महिलेला नको वाटतात. कारण त्या दरम्यान होत असलेल्या वेदनांमुळे महिलांना खूप त्रास होतो. सध्याची व्यस्त जीवनशैली, फास्टफूडचे जास्त सेवन जेवणाच्या वेळा ठराविक नसणं, ताण येणं अशा अनेक कारणांमुळे महिलांना मासिक पाळीच्या त्रासाचा सामना करावा लागतो. जीवनशैलीत आणि आहाराच्या पद्धतीत बदल घडवून आणल्यास महिलांच्या शारीरिक समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. याबाबत ऋजुता दिवेकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. चला तर मग जाणून घेऊया न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिलेल्या काही खास टिप्स.
मनुके, केळी, तूप खायलाच हवं
सकाळी उठल्यानंतर भिजवलेले मनुके खाण्याचा प्रयत्न करा. दुपारनंतर एक केळं नियमितपणे खावं. रोज चमचाभर तूप खाण्यामुळे पाळीदरम्यान उद्भवणारा त्रास कमी होतो. वजन वाढतं म्हणून अनेकदा तूप खाणं टाळलं जातं पण एक चमचा तुपाचा वापर आपल्यासाठी गुणकारी ठरतो.
राजगिरा आहारात असावा
आहारात राजगिरा हा आणखी एक नियमित खाण्यात येईल असा पदार्थ आहे. तुम्ही राजगिऱ्याची चिक्की किंवा लाडूही खाऊ शकता. राजगिरा खाल्ल्यास आपल्याला कॅल्शियमची कमतरता कधीच जाणवणार नाही याशिवाय बटाटा, सुरण, रताळे नियमितपणे खाल्ले तर पीरियड पेन (PCOD) किंवा पाळीच्या वेळचा त्रास निश्चित कमी होईल, असं आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आहे.
सगळ्या प्रकारच्या पीठांचा समावेश
बाजरी, मका, ज्वारी यांचाही आपल्या आहारात समावेश असणं गरजेचं आहे. आजकाल मल्टिग्रेन आटा खाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे, पण सगळी धान्य एकत्र करुन खाण्यापेक्षा वेगवेगळी खाणं जास्त फायद्याचं ठरू शकतं. संध्याकाळी एक केळं खाल्यास अशा उपायांनी पाळीदरम्यान वेदना कमी होण्यास मदत होते. तसंच पाळीमध्ये अनेक जणींना मूड स्विंग्जची समस्या जाणवते तीदेखील यामुळे कमी होते. आयएमएने कोरोना उपचारांबाबत पुरावे मागिल्यानंतर, अखेर आरोग्य मंत्रालयाकडून खुलासा
बटाटासुद्धा खायला हवा
विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी बटाट्याचा आहारात समावेश करू नये, असं सांगितलं जातं पण योग्य प्रमाणात बटाटा खाल्ल्यास त्याचा उपयोग अनेक आजारांना दूर ठेवतो. आठवड्यातून 3-4 वेळा या भाज्या आहारात असायला हव्यात.असं ऋजुता दिवेकर यांनी सांगितले. सावधान! पुरूषांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, तज्ज्ञांनी सांगितली कारणं अन् लक्षणं