शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

Women Health: पाळीदरम्यान शरीर संबंध येऊ नयेत म्हणून धर्मशास्त्राने केली होती अशी आखणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 1:33 PM

Women Health : मासिक पाळीसंदर्भात अनेक उलट सुलट चर्चा होताना दिसते, परंतु त्याचा संबंध स्त्री देहापुरता मर्यादित नाही तर संततीच्या आरोग्याशीही निगडित आहे. 

>> उन्नती गाडगीळ 

पृथ्वीवरील प्रत्येक सजीव निसर्ग निर्मित आहे. त्याच्या अंतरात विज्ञान आहेच. अभ्यासाने,संशोधनाने ,प्रयोगाने गती देऊन प्रगती साधणे हे विज्ञान आहे.निसर्गाभिमुख राहून विज्ञान पारंगत होणे ही गरज आहे. याच विज्ञानाच्या अभ्यासाचा एक भाग म्हणजे पाळी! अलीकडे त्यावर मुक्त चर्चा होताना दिसते. परंतु इथे केवळ स्वातंत्र्याला महत्त्व देऊन चालणार नाही, तर वैज्ञानिक आणि त्याबरोबरच धर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार व्हायला हवा!

मुलींना बाराव्या/ तेराव्या वर्षापासून दरमहा पाळीच्या दरम्यान अ रक्तस्त्राव वाहून जातो. नवीन,शुद्ध रक्त तयार होऊन गर्भाशय तयार होते. अनाहत कर्म निसर्ग करतो. कोवळ्या नाजूक तनुला डौलदार पणा येतो. कांतीला तजेला येतो. तारुण्य पिटिका गाली उमटतात. तनमन मोहोरते. भावना उद्दीपित होतात. कळीचे फूल बनणे हा वेदनांसह सुखसोहळा असतो. त्याच वेळेस या उमलणाऱ्या कळीचा सांभाळ करणे ही मोठी जोखीम असते. 

चार दिवसांचा विटाळ का?

शरीरातील  स्त्राव बाहेर पडत असताना, जर शरीर संबंध आला,तर स्त्रियांना त्रास होतो. शारीरिक व मानसिक थकवा येतो.  आणि स्त्री ला आनंद घेण्या ऐवजी  भिती वाटते.उबग येतो. पूर्वी मनमोकळे संवाद नव्हते. कारण मुली आणि मुलगे सुद्धा वयाने लहान होते. पण बचावासाठी काय करावे? हे ज्ञान नव्हते. म्हणून दोघांना(पती-पत्नी) एकत्र आणायचेच नाही ,म्हणजे बाजूला बसवणे. आणि आराम देणे, हा हेतू होता. 

विवाह प्रथेचा हेतू :

विवाह याचा हेतूच मुळी शरीरसंबंध आणि सुंदर, सुदृढ संपन्न  कुलवृद्धी हा होता. हेतू चांगला होता.शिक्षणाची वृद्धी झाली.मुली शाळेत जाऊ लागल्यावर सुद्धा  विटाळशीसाठी राखीव कोपरा, राखीव मोरी, पूर्वी वाड्यात शाळा भरत तेथे असत. ही प्रथा हळूहळू बंद झाली. पण त्यामुळे त्या चारदिवस अशुद्ध रक्तस्त्राव असताना, कंबरदुखी, पोटदुखी असताना सुद्धा स्त्रियांना घरात, बाहेर ढोर मेहनत घ्यावी लागते.

कुलधर्म- कुलाचार :

रक्त स्त्राव काळात तन अस्वस्थ, असते.आजारी ,अशक्त असते. मन उदास असते.उदास मनाला उत्तेजित करण्यासाठी त्या काळात शिवणे, विणणे, निवडणे, टिपणे, भरतकाम करायला देत असत. त्या नंतरचे काळात महिला शाळेत जाऊ लागल्या तेव्हा, त्या चार दिवसांत बाजूला बसून पाढे म्हणणे,गणिते सोडवणे,शुद्धलेखन करणे,वाचन करणे करत. बायका अशा खटाटोपी, की त्यांनी त्या चार दिवसांचाही उपयोग करून घेतला. माझ्या आजीला महिन्यातील ते चार दिवस पर्वणी वाटे. कारण तिने चारवर्षात फायनल म्हणजे तेव्हाची इयत्ता सातवी पास केली. दर महिन्याच्या त्या चार दिवसांत तिला दिवस रात्र अभ्यास करायला वेळ मिळे. अशी आणखीही अनेक उदाहरणे देता येतील. प्रतिकूलतेत त्यांनी अनुकूलता शोधण्याचा सराव केला. मात्र, आता प्रत्येक दिवस प्रतिकूल असतो. घड्याळाच्या काट्याशी मुकाबला असतो. त्यामुळे अनुकूलता शोधणे आणि त्या चार दिवसात आराम मिळवणे दुर्मिळच झाले आहे. 

याला विटाळ मानावा का?

मल,मूत्र,थुंकी,शेंबूड,रक्त जे स्त्राव शरीराबाहेर टाकले जातात ,ते आपण अस्वच्छ मानतो. लगेचच आपण हातपाय तोंड धुतो. स्वच्छता पाळतो. अगदी तान्हुल्याला सुद्धा त्या घाणीत ठेवत नाही. देवाची पूजा करण्यापूर्वी  सुद्धा शुचिर्भूत होतो. ऋतुस्त्रवा काळात आपण   दुर्गंधी, नकोसा स्त्राव बाळगताना, मन आजारी,उदास ,दुखरे असताना पूजेने मनाला प्रसन्न कसे वाटणार?

 त्यामुळे इथे केवळ शरीर शास्त्र नाही तर मानस शास्त्रही जोडले गेले आहे ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे तो काळ विटाळ ठरवला गेला. त्या काळात देहाने पूजा शक्य झाली नाही तरी मानस पूजा करणे सहज शक्य आहे. 

जुन्या रीतीरिवाजांना नावे ठेवण्याच्या नादात, महिला सर्व गोष्टी आपल्या अंगावर घेतात. चिडचिड, बडबड, नैराश्य ओढवून घेतात. स्व तनामनाची स्वच्छता, शुचिता, पवित्रता राखा आणि मग देव पूजा,पोटपूजा करा.काही महिला विज्ञानाच्या आधीन होतात.आता नकोच ती दरमहा कटकट म्हणून आपणहून गर्भाशय (Uterus) काढून टाकायला तयार होतात.

 स्त्री-भृण हत्या करणे./ स्व मने गर्भपात करणे./संतती नियमनाची साधने नैसर्गिक सुंदर शरीरात बरीच वर्षे बसविणे /सतत संततीप्रतिबंधक गोळ्या-औषधे घेणे...हे निसर्गाच्यावर विज्ञान वार करण्यासारखे आहे. परिणामी जन्मभर शरीर खिळखिळे होते. अशक्त वा अति स्थूलता वगैरे तनामनाचे रोग भोग त्रस्त करतात. त्यामुळे या विषयाकडे संतुलित दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे आणि शांतपणे विचार केला पाहिजे. 

आपण निसर्ग निर्मित वृक्षाला-पाना-फुलांना सुद्धा जपतो. जतन करतो. पण तनुवेलीवर मात्र सतत विज्ञान सहाय्याने आघात करतो. तसे न करता विज्ञानाचा सदुपयोग करून घेऊया. ज्ञान मिळवुया. भान राखुया.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWomenमहिलाMenstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्यSexual Healthलैंगिक आरोग्य