(Image Credit : Goddess Sculpting)
आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने महिलांच्या आरोग्याचीही चर्चा होऊ लागली आहे. महिला नेहमी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्या घर आणि ऑफिस अशी दुहेरी भूमिका चोख बजावतात. पण जेव्हा विषय आरोग्याचा येतो तेव्हा त्या स्वत:कडे दुर्लक्ष करतात.
सतत काम करून थकवा आल्यावरही महिला काम करत असतात. मात्र त्यांना अशाप्रकारे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकतं. त्यामुळे thehealthsite.com ने तुमच्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वत:ला फिट ठेवू शकता. जर तुमचं आरोग्य चांगलं राहिलं तर परिवाराचं आरोग्य चांगलं राहील.
पोषक आहार
तुम्ही कितीही बिझी असल्या तरी जेवण कधीच टाळू नका. जेवणाने आपल्याला पोषण मिळतं. पौष्टीक आहाराने मानसिक आणि शारीरिक रूपाने तुम्ही फिट रहाल. तुमच्या बॅगमध्ये मुठभर बदाम ठेवा. जेव्हाही भूक लागेल तेव्हा हे खाऊ शकता. संतुलित आहाराचं सेवन करा. नाश्ता आणि जेवण टाळून कोणतही काम करू नका. कारण यानेच तुम्हाला काम करण्यासाठी शक्ती मिळेल.
वेळेवर खावे
कोणतही काम असो ते नियमाने, शिस्तबद्ध पद्धतीने केलं पाहिजे. अशा सर्वात महत्त्वाचं ठरतं ते वेळेवर जेवण करणे. कामाच्या ओझ्यामुळे अनेकदा महिला वेळी-अवेळी जेवण करतात. त्यामुळे त्यांना नंतर खूप थकवा जाणवतो. पण मुळात शरीराला नियमित आणि वेळेवल पोषणाची गरज असते. त्यामुळे वेळेवर जेवण करणे फार महत्त्वाचे आहे.
स्मार्ट पद्धतीने करा नाश्ता
कधी काहीही खाऊ नका. नाश्ता चुकवू नका. नाश्ता नेहमी पोटभर केला पाहिजे. नाश्त्यामध्ये भरपूर पौष्टीक आहार घेतला पाहिजे. यात तुम्ही मोड आलेले धान्य, सलाद, इडली, वडा सांबर असे पदार्थ खाऊ शकता.
फिरण्यासाठी वेळ काढा
एका फिट शरीर आणि सक्रिय मेंदू निरोगीपणाचं प्रतिक आहे. रोज सकाळी थोडा वेळ काढून फिरायला जावे. केवळ चांगल्या आहाराने तुम्ही फिट राहणार नाही तर तुम्हाला एक्सरसाइज करणंही गरजेचं आहे. फार काही न करात केवळ पायी चालण्यासही गेल्या तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. शारीरिक हालचालीसाठी काही वेळ आवर्जून काढा.
स्वत:साठी वेळ काढा
प्रत्येक महिलेने दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी आराम करण्यासाठी काढला पाहिजे. तुमच्या आवडी-निवडीसाठी वेळ काढायला हवा. सुट्ट्यांमध्ये कुठेतरी फिरायला जायला पाहिजे. मैत्रिणींना भेटण्यासाठी जायला पाहिजे. म्हणजे रोजच्या लाइफस्टाइलमधून थोडा वेळ स्वत:साठी काढला पाहिजे.