अनेकदा महिलांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. शरीराच्या काही अशा अवयवांना अनेकदा समस्या उद्भवतात. ज्याबाबत आपण उघडपणे विचारू शकत नाही. अनेक महिलांना उद्भवणारी अशीच एक समस्या म्हणजे, ब्रेस्ट खाली होणारे रॅशेज. ही समस्या जास्त घाम आल्यामुळे, टाइट ब्रा वापरल्यामुळे किंवा अस्वच्छतेमुळे उद्भवते. तसेच अति लठ्ठपणाही या समस्येचं कारण ठरू शकतं. ब्रेस्टखाली झालेले रॅशेज फंगल इन्फेक्शन होण्याचंही कारण ठरू शकतात. ज्यामुळे त्वचेच्या त्या भागामध्ये किटाणू वाढू लागतात. परिणामी फंगल इन्फेक्शन वाढतं. अनेकदा ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांमध्ये देखील ही समस्या उद्भवते. ज्यामध्ये त्वचेवर लाल चट्टे येतात आणि जळजळ, सतत खाज येणं तसेच त्वचा कोरडी होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. सतत खाजवल्यामुळे ही समस्या आणखी वाढू शकते. त्यामुळे या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. जाणून घेऊया अशा घरगुती उपायांबाबत जे या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी मदत करतील.
कॉटन
ब्रेस्टखाली होणाऱ्या इन्फेक्शनपासून सुटका करून घेण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे कॉटनचा वापर करा. यासाठी ब्रेस्टच्या खाली कापूस ठेवावा. त्यामुळे मॉयश्चर किंवा घाम कापसामध्ये शोषून घेतला जाईल. कॉटनऐवजी तुम्ही टिशू पेपरचाही वापर करू शकता. तुम्हालाही ही समस्या उद्भवत असेल तर शक्य तेवढे सुती कपडे वापरा.
सफरचंदाचं व्हिनेगर
अनेकदा कपड्यांमध्ये असलेल्या अॅसिडमुळे त्वचेला रॅशेज होतात. सफरचंदाच्या व्हिनेगरच्या मदतीने या समस्येपासून सुटका करणं सहज शक्य होतं. त्यासाठी सफरचंदाचं व्हिनेगर त्वचेवर लावू शकता. सर्वात आधी रॅशेज झालेली जागा थंड पाण्याच्या मदतीने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर त्वचा कोरडी करून घ्या. आता एक चमचा सफरचंदाचं व्हिनेगर एक कप पाण्यामध्ये एकत्र करा आणि इन्फेक्शन झालेल्या जागेवर लावा. अशाप्रकारे दिवसातून 2 ते 3 वेळा असं केल्याने समस्येपासून सुटका होऊ शकते.
नारळाचं तेल
नारळाच्या तेलामधील उपयोगी तत्व इन्फेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये अॅन्टीबॅक्टेरिअल आणि अॅन्टीफंगल गुमधर्म अस्तित्वात असतात. जे ब्रेस्टखाली झालेल्या इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करतात. इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी शुद्ध नारळाचं तेल लावा. दिवसातून 2 ते 3 वेळा असं केल्याने रॅशेज दूर होण्यास मदत होते.
कोरफड
कोरफडीमध्ये अॅन्टीबॅक्टेरिअल आणि अॅन्टीफंगल गुणधर्म असल्यामुळे खाज आणि जळजळ होण्याची समस्या दूर होते. तुम्ही याचा वापर करताना त्यामध्ये चिमूटभर हळदही एकत्र करू शकता. कारण हळदीमध्ये अॅन्टीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यासाठी कोरफडीच्या पानांमधून गर काढून इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावा आणि 20 मिनिटांपर्यंत ठेवा.
लसूण
लसणामध्ये असलेले अॅन्टीसेप्टिक गुणधर्म ब्रेस्टखाली झालेले रॅशेज दूर करण्यासाठी मदत करतात. त्यासाठी लसणाच्या काही पाकळ्या रात्री ऑलिव्ह ऑइलमध्ये भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी रॅशेजवर हे मिश्रण लावा. काही तास तसचं ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. असं दिवसातून 3 ते 4 वेळा करा.
टिप : हे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या आणि इन्फेक्शन जास्त झालं असेल तर डॉक्टरांच्या सल्याने औषधोपचार करा.