धावपळीचं जीवन आणि उलटसुलट खाण्याने अनेकांमध्ये अॅसिडीटीची समस्या सामान्य बाब झाली आहे. अनेकदा तळलेले-भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात गॅस होते. अॅसिडीटीमुळे पोट दुखणे, छातीत जळजळ होणे आणि अनेकदा डोकेदु:खीची समस्या होते. पण ही समस्या दूर करण्याचे अनेक घरगुती उपाय आहेत. हा त्रास कमी करण्यासाठी कोरफड (अॅलोव्हिरा) चांगला उपाय मानला जातो.
कोरफड कसं करतं अॅसिडीटीवर काम?
अमेरिकन जर्नल ऑफ न्यूट्रीशनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, कोरफडीत अॅंडी-इंफ्लेमेटरी, अॅनाल्जेसिक, अॅंटीमायक्रोबल, अॅंटी अल्सर, अॅंटी ऑक्सीडेंट आणि डायुरेटिक गुण असतात. त्यामुळे कोरफड हे पोटाच्या समस्येवर रामबाण उपाय समजलं जातंय. कोरफडीत पचनक्रिया आणि आंम्लपित्त रोखण्यास मदत मिळते. कोरफडमधील गुण अॅसिडीटीच्या लक्षणांना संपवण्यात मदत करतात.
कसा कराल वापर?
बाजारात कोरफडीचा ज्यूस सहज उपलब्ध होतो किंवा तुम्ही तो घरीही बनवू शकता. जेवणाच्या 20 मिनिटेआधी कोरफडीचा ज्यूस तुम्ही घ्या. जर तुम्हाला अॅसिडीटीची समस्या असेल तर अर्धा कप ज्यूस घ्या.
इतर फळांच्या ज्यूससोबत कोरफडीचा ज्यूस
अनेकांना कोरफडीच्या ज्यूसची टेस्ट आवडत नाही. त्यामुळे अनेकजण हा ज्यूस पिण्यास टाळाटाळ करतात. अशांनी काळजी करण्याची गरज नाही. कारण कोरफडीचा ज्यूस तुम्ही इतर फळांच्या ज्यूससोबत किंवा खासकरुन नारळाच्या पाण्यासोबत घेऊ शकता.
कोरफडीचे फायदे
1) डोळ्यांचे सौंदर्य वाढवते
एका ग्लास पाण्यामध्ये थोडा कोरफडीचा रस टाका आणि सकाळी ह्या पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. डोळे स्वच्छ ठेवण्याचा हा नैसर्गिक उपाय आहे .
2) पचन संस्था सुरळीत करते
रोज सकाळी कोरफडीचा रस सेवन केल्याने पचन संस्था स्वच्छ होते आणि दिवसभर पचन संस्था सुरळीत काम करते.
3) वजन कमी करण्यास उपयोगी
तुम्हाला माहिती आहे का कोरफडीचा रस वजन कमी करण्यासही मदत करतो. रोजच्या सेवनाने तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि चयापचय क्रिया सुरळीत होते .
4) मधुमेहावर उपयोगी
तुम्ही जर कोरफडीचा रस रोज सेवन केला तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते .
5) कोलेस्ट्रॉलची योग्य मात्रा राखण्यास मदत
कोरफडीच्या रसामध्ये शीत गुणधर्म आढळतात त्यामुळे ते तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल ची मात्रा कमी करते. त्याचबरोबर ढोबळमानाने तुमचे संपूर्ण शरीर निरोगी राहण्यास मदत होते .
6) सांध्यांच्या दुखण्यासाठी
ज्या व्यक्तींना गुडघ्यांचे किंवा सांध्यांचे दुखणे असते त्यांनी हा रस रोज घ्यावा. स्नायूंच्या दुखण्यावरही हा रस मात करतो.